तीनमुशीकडील तलाव काठाच काम अर्धवट ; पावसात अपघाताची शक्यता !

Edited by: विनायक गावस
Published on: May 28, 2023 19:57 PM
views 99  views

सावंतवाडी : मोती तलावातील गाळ चुकीच्या पद्धतीने काढल्यामुळे ३० जून रोजी उपजिल्हा रुग्णालयासमोरील काठ तलावात कोसळला होता. या संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी १ कोटी १३ लाख ७४ हजार रुपये मंजूर करत डिसेंबर महिन्यात कामाला सुरुवात करण्यात आली होती. उर्वरित भिंत बांधून पूर्ण झाली असली तरी तिनं मुशीकडील बांधकाम अर्धवट आहे. त्यात पादचाऱ्यांसाठीच्या फुटपाथचा अद्याप पत्ता नाही आहे. जुना मुंबई-गोवा महामार्ग लगत असल्याने रहदारीच प्रमाण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पावसाळ्यात अपघात होण्याची दाट शक्यता आहे.


प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या डोक्यातील सुपिक कल्पनेमुळे हा तलाव काठ कोसळला होता. या काठाच बांधकाम करण्यासाठी सुमारे १ कोटी १३ लाखांचा भुर्दंड शासनाच्या तिजोरीवर पडला आहे. या संरक्षक भिंतींच काम अंतिम टप्प्यात असून तिनं मुशीकडील बांधकाम अद्याप पूर्ण झालेल नाही. तर येथील पादचारी मार्गावरील फुटपाथचा देखिल अद्याप पत्ता दिसत नाही. मातीचे ढिगारे या ठिकाणी असून पावसाला काहीच दिवस शिल्लक राहिलेले असताना येथे चिखल होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. 


याबाबत नगरपरिषद बांधकाम विभागाचे अभियंता शिवप्रसाद कुडपकर यांना विचारले असता याच इस्टिमेट पाठल असून निधीची मागणी केली आहे. निधी उपलब्ध होताच हे काम सुरू होईल अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली. तर पावसाळ्याआधीच हे काम होण आवश्यक होत. परंतु, स्थानिक आमदार व प्रशासनाच नियोजन नसल्याच यात दिसत आहे. आबालवृद्ध मॉर्निंग व इव्हिनींग वॉकसाठी रोज तलावावर येतात. त्यामुळे पावसात या ठिकाणी चिखल होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचा दृर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार ? असा सवाल पादचाऱ्यांकडून केला जातो आहे.