
कणकवली : कणकवली नगरपंचायतचे काम महाराष्ट्रात एक नंबरचे आहे. कोणतीही नगरपंचायत असे उपक्रम राबवित नाही. मोठ्या शहरातील उपक्रम आपल्या कणकवली मतदासंघांत असावेत, असे आ. नितेश राणेंचे प्रयत्न असतात. कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे आणि टीम चांगली साथ देत असतात. त्यामुळे कणकवली शहरातील नागरिकांना वैविध्यपूर्ण उपक्रमांचा लाभ घेता येतो.बॉक्स क्रिकेट स्टेडियम व फुटबॉल स्टेडियमचे माध्यमातून चांगले खेळाडू निर्माण होतील, असा विश्वास माजी खा.निलेश राणे यांनी व्यक्त केला.
कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून कणकवली गडनदी जवळ श्रीधर नाईक उद्यानानजीक लावण्यात आलेल्या एलईडी स्वागत बोर्ड व छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी साकारण्यात आलेल्या बॉक्स क्रिकेट स्टेडियम व फुटबॉल स्टेडियमचे लोकार्पण माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते व आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत,नगराध्यक्ष समीर नलावडे,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,मिलिंद मेस्त्री,सरचिटणीस मनोज रावराणे, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, बँक संचालिका प्रज्ञा ढवण,शहराध्यक्ष अण्णा कोदे,सरपंच संदीप सावंत,नगरसेवक अबिद नाईक,शिशिर परुळेकर,मेघा गांगण,सुप्रिया नलावडे ,महेश सावंत ,प्रकाश सावंत,आदींसह शहरातील नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. आ. नितेश राणे म्हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या सूचनेनुसार आपल्या कणकवलीत उड्डाण पुलाखाली सुशोभीकरण व्हावे, त्यानुसार आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक विकसित केला. त्या ठिकाणी युवकांना चांगलं मैदान उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण आम्ही केलं आहे. कणकवली येथील युवकांसाठी हे मैदान उपलब्ध केलं आहे, त्यामुळे शहरातील जनता आमच्या पाठीशी राहील. यावेळी मैदानाचे श्रीफळ वाढवून शुभारंभ नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले.