सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये सिटीस्कॅन मशीन बसवण्याचं काम युद्धपातळीवर

Edited by:
Published on: December 11, 2023 11:16 AM
views 500  views

सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये सिटीस्कॅन मशीन कृष्णा प्रायव्हेट ली.कंपनी पुणेच्या मार्फत फेब्रुवारी २०२४ मध्ये सावंतवाडी व कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये बसविण्यात येणार आहे. तसेच M R I मशिनरी ओरोस रुग्णालयामध्ये या कंपनी मार्फत बसविण्यात येणार आहे. युद्धपातळीवर सावंतवाडीउप जिल्हा रुग्णालयामध्ये याच काम चालू आहे अशी माहिती जीवनरक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांनी दिली. 

राजू मसुरकर, प्रवीण टोपले, सुनील कोरगावकर संजय डुबळे यांनी आज या ठिकाणी सदिच्छा भेट देऊन कामाची पहाणी केली. या मशिनरीसाठी जीवनरक्षा प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री राजु मसुरकर यांचे निवेदन व पाठपुराव्यानुसारपालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडुन मंजूर करण्यात आली. मशिनरी बसविणेचे काम युद्धपातळीवर चालू आहे.त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना आता शासनाकडून मोफत सिटी स्कॅन तपासणी सुविधा उपलब्ध होणार आहे असं मसुरकर म्हणाले.