
सावंतवाडी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या सहा महिन्यांत चांगलं काम करत धडाकेबाज निर्णय घेतलेत. रात्रंदिवस ते काम करत असल्यानं त्यांच्याबद्दल जनमानसांत आदर आहे. वसंतदादा पाटील यांच्यानंतर एक आदर्श मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहीजे जात आहे. एकनाथ शिंदे यांचे काम चांगल असल्यान त्यांना आता कोणीही हटवू शकत नाही. २०२४ ला सुद्धा पुन्हा तेच मुख्यमंत्री असतील, असा दावा शिवसेना नेते ब्रिगेडीयर माजी खासदार सुधीर सावंत यांनी केला. शरद पवार यांच्या सांगण्यावरून राष्ट्रवादी सोबत गेलात तर शिवसेना फुटणार, त्यामुळे विचार करा, असा सल्ला उध्दव ठाकरें यांना फोन करुन दिला होता. पण, त्यांनी ऐकलं नाही आणि आज ते घडलंय, अस वक्तव्य त्यांनी केल.
दरम्यान, शिवसेना म्हणून अधिकृत नाव आणि पक्ष चिन्ह मिळाल्यानंतर अनेकांनी प्रवेश करण्यास सुरवात केली आहे. नारुर-हिर्लोक येथे काल मोठा प्रवेश झाला असून आता जिल्ह्यात अन्य ठीकाणी सुध्दा मोठ्या प्रमाणात प्रवेश होणार आहेत, असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाध्यक्ष नारायण ऊर्फ बबन राणे, किसन मांजरेकर, योगेश तुळसकर आदी उपस्थित होते.