'न्हावण कोंड' चा धबधबा प्रवाहित

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 06, 2023 20:05 PM
views 70  views

देवगड : तळवडे येथील 'न्हावण कोंड' चा धबधबा सतत दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे जोरदार प्रवाहित झाला आहे. पर्यटकांच्या पसंतीचा असलेला न्हावण कोंड या धबधब्यावर दर वर्षी पर्यटक मोठया संख्येने येत असतात आणि तेथे येऊन पर्यटनाचा आनंद घेत असतात. देवगड तळवडे येथील 'न्हावण कोंड' चा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू आहे.देवगड तसेच गोवा,मुंबई,कोल्हापूर येथून पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटकांन साठी पर्वणी असलेल्या 'न्हावणकोंड' या धबधब्याची  वर्ष्या पर्यटना साठी पर्यटकांन कडून पहिली पसंती असते.तसेच आता हा धबधबा सतत दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ओसंडुन वाहत आहे.व पर्यटकांना साद घालत आहे.