
दोडामार्ग : तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अति पर्जन्यवृष्टीमुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. गेल्या २४ तासामध्ये धरणाच्या पाणी पातळीमध्ये २.०० मी ने वाढ झालेली आहे. रविवारी संध्याकळपर्यंत पाणी पातळी ९९.४० मी असुन सांडवा पातळी १०६.७० मी इतकी आहे. तरी येत्या २ ते ३ दिवसा मध्ये धरणाच्या ROS व GOS नुसार धरण क्षेत्रातील पाणलोट क्षेत्रामधुन येणारे अतिरीक्त पाणी नियंत्रित पद्धतीने पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीत सोडण्याचे नियोजन आहे. त्या अनुषंगाने खळग्यातील दगडी धरणाच्या सांडव्यावरून अतिरीक्त पाणी नियंत्रित पद्धतीने पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीत सोडण्यात येणार असल्याने तसेच सद्य स्थितीत धरणाच्या परीसरात पावसाचे प्रमाण वाढले असल्याने धरण क्षेत्राबाहेरील पाणलोट क्षेत्र, तसेच तेरवणमेढ़े उन्नैई बंधा-या मधिल खरारी नाल्यात सोडण्यात येणारे पाणी तिलारी नदीपात्रात येवून तिलारी नदीपात्राची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे.
तरी नदीकाठच्या ग्रामस्थांना व शेतक-यांना येत्या तीन ते चार दिवासामध्ये तिलारी नदीपात्रातील प्रवाह कधीही वाढु शकत असल्याने जिवित व वित्तहानी टाळणेसाठी नदीपात्रात उतरू नये व सावधानता बाळगावी असा इशारा तिलारी प्रकल्पा कडून देण्यात आलाय. तसेच रात्रीच्या वेळी नागरीकांनी सदर नदी पात्रातून ये-जा करू नये, नदी पात्रात कपडे धुण्यासाठी जाणा-या महिला, नदी पात्रात पाण्यासाठी गुरे सोडणारे शेतकरी यांनी या बाबत आवश्यक ती सतर्कता बाळगावी. नदीकाठच्या व इतर सर्व ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय अशी माहिती, तिलारीचे उप विभागीय अधिकारी गजानन बुचडे यांनी दिला आहे.