
मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकोट येथे आगमन झाले आहे. पंतप्रधानांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले आहे. त्यामुळे आता पर्यटकांसाठी हा राजकोट किल्ला खुला होणार आहे. काही क्षणात तेथून त्यांचा ताफा हा पुन्हा माघारी फिरून सागरी महामार्ग, बसस्थानक, भरड तारकर्ली नाका येथून तारकर्ली एमटीडीसी येथे दाखल होणार आहेत.
त्यानंतर तारकर्ली किनाऱ्यावर भारतीय नौसेना दीन साजरा होणार आहे. या कार्यक्रमाला देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीयमंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यासह अन्य अतिमहनिय व्यक्ती उपस्थित आहेत.