शेर्लेतील शिला फलकाच्या अनावरणाचा शहिद अंकुश तारी यांच्या वीरपत्नींना मान !

Edited by: विनायक गावस
Published on: August 14, 2023 11:11 AM
views 304  views

सावंतवाडी : ग्रामपंचायत शेर्ले येथे 'मेरी मिट्टी मेरा देश' या अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करणेत आले असून शिला फलकाचे अनावरण शहिद अंकुश सखाराम तारी यांच्या वीरपत्नी तारी यांच्या हस्ते करण्यात आले.

याबरोबर ध्वजारोहण, पंचप्राण शपथ, वृक्षारोपण, शहिद वीरांना श्रद्धांजली, गावातील माजी सैनिक, निवृत्त पोलीस यांचा सत्कार सन्मान सोहळा करणे आला. तर मूळ मात्र कलश भरणे, हर घर तिरंगा झेंडा फडकविणे या बाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सरपंच प्रांजल प्रशांत  जाधव, उपसरपंच दीपक झिलू नाईक, ग्रामसेवक राजन रामा नाईक, माजी ग्रा.पं.सदस्य,  माजी सैनिक, माजी सरपंच, पोलीस पाटील, शासकीय कर्मचारी, लोकप्रतिनिधी, ग्रा.पं. कर्मचारी, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.