आशिये गावात उबाठा शिवसेनेचा झंझावाती प्रचार

जि. प. उमेदवार वैदेही गुडेकर यांना मतदारांचा लक्षणीय प्रतिसाद
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: February 03, 2026 12:55 PM
views 97  views

कणकवली : कलमठ जि. प. मतदारसांतील आशिये गावात उबाठा शिवसेनेने मंगळवारी जोरदार प्रचार केला. उबाठा सेना कार्यकर्त्यांनी आशिये गावात अगदी 'डोअर टू डोअर' फिरून मतदारांना उबाठा शिवसेनेच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. कलमठ जिल्हा परिषद मतदार संघाचा आतापर्यंत अपेक्षित विकास होऊ शकलेला नाही, हे वास्तव आहे. त्यामुळेच कलमठ मतदार संघाच्या विकासासाठी उबाठा शिवसेनेला भरभरून मतदान करा, असे आवाहन उमेदवार वैदेही गुडेकर व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले. 

यावेळी बोलताना आशिये गावच्या माजी सरपंच सौ. रश्मी बाणे, ज्येष्ठ कार्यकर्ते जगन्नाथ आजगावकर यांनी संपूर्ण आशिये गाव आमच्या उमेदवार वैदही गुडेकर यांच्या पाठीशी राहील, असा विश्वास व्यक्त केला. कलमठ शहर प्रमुख धीरज मेस्त्री यांनीही वैदेही गुडेकर यांना कलमठ गावातून मोठे मताधिक्य देण्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी उबाठा शिवसेनेच्या महिला तालुकाप्रमुख माधवी दळवी, दिव्या साळगावकर, रोहिणी पिळणकर, सत्यविजय गुडेकर, विलास गुडेकर, लक्ष्मण गुडेकर, सिताराम चिंदरकर, संकेत गुडेकर, रघुनाथ गुडेकर, पंकज चिंदरकर, जयवंत गुडेकर आदी उपस्थित होते.