मळेवाडमध्ये दोन्ही उमेदवार भाजपचे विजयी होतील : उपसरपंच हेमंत मराठे

जनता विकासाला देईल साथ
Edited by: विनायक गांवस
Published on: February 03, 2026 14:06 PM
views 67  views

सावंतवाडी : मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघातून जिल्हा परिषद व पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार विजयी होतील असा विश्वास उपसरपंच हेमंत मराठे यांनी व्यक्त केला. येथील जनता विकासाला साथ देईल असा दावा त्यांनी केला. 

मळेवाडा जिल्हा परिषदेसाठी अपर्णा सातोसकर तर मळेवाड पंचायत समितीत धनश्री मराठे, न्हावेलीतून अष्टविनायक धाऊसकर मैदानात असून तिन्ही उमेदवारांचा विजय होईल असा विश्वास हेमंत मराठे यांनी व्यक्त केला. गावात केलेला विकास, आरोग्य सुविधा, सामाजिक कामाला जनता साथ देईल असं मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी मळेवाडा जिल्हा परिषदेसाठी अपर्णा सातोसकर, मळेवाड पंचायत समितीत धनश्री मराठे, मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे, ओंकार प्रभू आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.