
सावंतवाडी : मळगाव घाट येथील गॅस पाईपलाईनसाठी खोदण्यात आलेले चर अखेर आज बुजवण्यात आले आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी बांधकाम अभियंता सौ. अनामिका चव्हाण यांचे लक्ष वेधले होते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून श्री दळवी यांनी बांधकाम अभियंता यांचे आभार मानले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह बांधकाम अभियंता सौ. अनामिका चव्हाण यांचे लक्ष वेधून मळगाव घाटीतील चर तात्काळ बुजवण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्या मागणीची अखेर दखल घेऊ असते तर पदाधिकाऱ्यांच्या समावेत ते बुजवण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांकडून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांबाबत समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी शहराध्यक्ष देवा टेंमकर, मळगाव ओबीसी तालुका अध्यक्ष सिद्धेश तेंडुलकर, हिदायतुल्ला खान, आशिष कदम , बावतिस फर्नांडिस , इफतिकार राजगुरू,आदी उपस्थित होते.