मालवण : सिंधुदुर्ग किल्ला जवळील खडकाळ भागात मालवण राजकोट येथील सुनील खंदारे यांच्या मालकीचा महागणपती ट्रॉलर समुद्रात बुडाल्याची घटना रात्री घडली.
दरम्यान, ट्रॉलरवरील सात ही खलाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून ट्रॉलर पाण्याबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली आहे.