अभिनव नगरमधील 'तो' रस्ता प्रकाशमय

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: December 17, 2023 16:27 PM
views 343  views

कुडाळ : कुडाळ नगर पंचायत हद्दीतील अभिनव नगर १ मधील रस्ता मागील पंधरा वर्षे वर्ष अंधारमय होता. नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार नगरसेवक मंदार शिरसाठ यांनी तातडीने याची दखल घेत अभिनव नगर एक मध्ये स्ट्रीट लाईटची व्यवस्था केली आहे. निवडणुकीत दिलेल्या वचनाला जागून नागरिकाच्या मागणीप्रमाणे नगरसेवक मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांनी सदर रस्तावर स्ट्रीट लाइट बसवल्याने अभिनव नगर १ मधील नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.