
कणकवली : कणकवली निमेवाडी येथे भव्य राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक 12 फेब्रुवारी दुपारी 1 वाजता कणकवली निमेवाडी येथे विश्वकर्मा मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले.
राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेमध्ये विजेच्या बैलगाड्याला \प्रथम पारितोषिक रुपये 15000 व चषक, द्वितीय पारितोषिक 10000 व चषक, तिसरे 5000 व चषक अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. स्पर्धेचे उद्घाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते होणार असून शिवसेना नेते अतुल रावराणे, सतीश सावंत, संदेश पारकर, नगरसेवक सुशांत नाईक यांच्यासह बहुसंख्य शिवसेना पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.
या विश्वकर्मा मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी बैलगाडी स्पर्धा आयोजन केले जाते. यंदाही भव्य अशी राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धा मोठ्या उत्साहात कणकवली निमेवाडी येथे होत आहे. यासाठी बहुसंख्य बैलगाडा स्पर्धकांनी या शर्यतीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कणकवली नगरसेवक सुशांत नाईक, विश्वकर्मा मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रतीक मेस्त्री यांनी केले.
यावेळी महेश मेस्त्री, बबन पांचाळ, सुभाष मेस्त्री, प्रकाश मेस्त्री, दशरथ मेस्त्री, गिरीश मेस्त्री, अरुण मेस्त्री, अनिकेत देसाई, विष्णू मेत्री, हर्षद साटम, योगेश मेस्त्री, संकेत पांचाळ, कल्पेश मेस्त्री, प्रथमेश मेस्त्री, मिलिंद पांचाळ, प्रशांत साटम, चंद्रकांत मेस्त्री, दत्तू मेस्त्री हे उपस्थित होते. अधिक माहितीसाठी नितीन पांचाळ 9096012514, महेश मिस्त्री 7499337414, अक्षय मेस्त्री 9096892176 प्रतीक मेस्त्री 8806014909 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.