सावंतवाडीत थोड्याच वेळात रंगणार १ लाखाच्या दहीहंडीचा थरार

सिने कलाकार रुचिरा जाधव, दिव्या फुगावकर राहणार उपस्थित ; भाजप नेते संदीप गावडे यांच्या माध्यमातून आयोजन
Edited by: विनायक गांवस
Published on: August 27, 2024 12:02 PM
views 178  views

सावंतवाडी : भाजपचे नेते संदीप एकनाथ गावडे यांच्या माध्यमातून आज  गोपाळकाल्याच्या पार्श्वभूमीवर  सायंकाळी ६ वाजल्यापासून  राणी पार्वती देवी हायस्कूल सावंतवाडीच्या पटांगणावर "भारतीय जनता पार्टी, सुंदरवाडी दहीहंडी उत्सव २०२४" चे आयोजन करण्यात आले आहे. 

 या दहीहंडी उत्सवासाठी सर्वात जास्त व शिस्तबद्ध थर लावणाऱ्या गोविंदा पथकास रोख रक्कम १ लाख ११ हजार १११ रुपयांचे पारीतोषीक व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.  तर इतर चार संघांना ११ हजार १११ रुपयांची उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत.

 या दहीहंडी महोत्सवास "माझ्या नवऱ्याची बायको " फेम मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव व *"मुलगी झाली हो " फेम दिव्या फुगावकर यांची खास उपस्थिती असणार आहे. तसेच ऑर्केस्ट्रा, पारंपारीक ढोलपथक, डिजे या दहीहंडी उत्सवाचे खास आकर्षण राहणार आहे.

हा दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी " बेस्ट इंस्टा स्टोरी "स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी १० स्मार्ट वॉच बक्षीस म्हणून ठेवण्यात आली आहेत. नागरिकांनी दहीहंडी उत्सवाचा फोटो आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर टाकावा आणि त्यामधे संदीप गावडे यांचा sandeep_gawade_official या इंस्टाग्राम अकाऊंट ला टॅग करावे तसेच स्पर्धेत पात्र होण्यासाठी फॉलो करणे बंधनकारक आहे. स्पर्धेचा निकाल याच इंस्टाग्राम अकाऊंट वर विजेत्यांना टॅग करुन कळविला जाईल. 

 तरी या दहीहंडी उत्सवास मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संदीप गावडे मित्रमंडळातर्फे करण्यात आले आहे.