
सावंतवाडी : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर पुरस्कृत व युवा सेना आयोजित १ लाख २१ हजारांच्या दहीहंडीचा थरार सावंतवाडीत रंगला. सिनेअभिनेता सौरभ गोखले यांच्या प्रमुख उपस्थितीसह ऑर्केस्ट्राच्या तालावर गोविंदांनी हंडीला सलामी दिली. अमेय तेंडोलकर मित्रमंडळाच्या गोविंदांनी भर पावसात थर लावत ही दहिहंडी फोडली.
शहरात भर पावसात दहिहंडीचा थरार बघायला मिळाला. एक लाखांची दहीहंडी बघण्यासाठी नागरिकांनी तलावाकाठी मोठी गर्दी केली होती. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर पुरस्कृत युवा सेना सावंतवाडीने तब्बल एक लाख २१ हजारांची दहीहंडी बांधली होती. श्रीराम वाचन मंदिर समोर हा थरार रंगला होता. विविध गोविंदा पथकांनी उपस्थित राहत हंडीला सलामी दिला तर ऑर्केस्ट्रा खास पर्वणी व उत्साह वाढविणारा ठरला. सिने अभिनेता सौरभ गोखले याच्या प्रमुख उपस्थितीन या सोहळ्यात चैतन्य निर्माण झालं होतं. अनेकांनी त्यांच्यासह फोटो घेतले.
रात्री अमेय तेंडोलकर मित्रमंडळाच्या गोविंदांनी ही दहीहंडी फोडत बक्षिस जिंकले. शहरातील तब्बल १९ दहीहंड्या त्यांनी फोडल्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, किर्ती बोंद्रे, प्रेमानंद देसाई, नितीन मांजरेकर, नंदू शिरोडकर, युवासेनेचे प्रतिक बांदेकर, अर्चित पोकळे, वर्धन पोकळे, दुर्गेश सुर्याजी, निखिल सावंत, प्रथमेश प्रभू, मेहर पडते, जोसेफ आल्मेडा, अनिकेत पाटणकर, गौतम माठेकर, साईश वाडकर, अभिजित गवस, संदीप निवळे, गौरेश कामत, शैलैश मेस्त्री, पांडूरंग वर्दम, देवेश पडते, पंकज बिद्रे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरूप्रसाद चिटणीस यांनी केले.