मालवणी भाषेतील गोडवा सर्वांना आपलेसे करते : दीपक केसरकर

Edited by: विनायक गांवस
Published on: March 04, 2026 15:17 PM
views 15  views

सावंतवाडी : सावंतवाडी शहराला सांस्कृतिक कलेचा वारसा आहे. कै. दिनकर धारणकर यांच्यानंतर नाट्य कलेत पडलेला खंड मालवणी करंडकच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुरू झाला, याचा मला अभिमान आहे. समितीच्या पदाधिकार्‍यांनी यात सातत्य ठेवावे, जेणे करुन दरवर्षी पुणे, मुंबईचे स्पर्धक या ठिकाणी येतील. मालवणी भाषेत गोडी असल्याने ती सर्वांना आपलेसे करते, असे मत माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांनी व्यक्त केले.

दरम्यान, "मालवणी करंडक महोत्सव" घेण्यासाठी पुढाकार घेणार्‍या अमोल टेंंबकर आणि रुजूल पाटणकर यांच्यासह त्यांच्या टिमची मालवणीसाठी सुरू असलेली धडपड कौतूकास्पद आहे, असे ही ते म्हणाले. ओंकार कलामंच, सावंतवाडी आणि पाटणकर एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या "मालवणी करंडक महोत्सवा"ला श्री. केसरकर यांनी भेट दिली. 

यावेळी माजी नगराध्यक्ष तथा महोत्सव समितीचे अध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते केसरकर यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी करंडक सभेचे अध्यक्ष अमोल टेंबकर, उपाध्यक्ष रूजूल पाटणकर परीक्षक सतीश पाटणकर उद्योजक चेतन नेवगी आदी उपस्थित होते. जेष्ठ रंगकर्मी कै. आबा नेवगी यांच्या स्मरणार्थ उद्योजक चेतन नेवगी यांनी पुरस्कुत केलेला पुरस्कार  कुडाळ येथील नाट्य कलाकार अंकुश कुभांर आणि जेष्ठ रंगकर्मी कै. दिनकर धारणकर यांच्या स्मरणार्थ हर्षवर्धन धारणकर यांनी पुरस्कृत केलेला पुरस्कार वेंगुर्ले-आसोली येथील दशावतार कलाकार आनंद नार्वेकर यांना देऊन सन्मानित करण्यात आले. 

या कार्यक्रमाचे औचित्य साधून ओंकार डान्स अ‍ॅकेडमीच्या पुजा पारधी, विश्व डान्स अ‍ॅकेडमीचे तुळशीदास आर्लेकर, जानू डान्स अ‍ॅकेडमीच्या जान्हवी सारंग, स्वराज्य अ‍ॅकेडमीचे हर्ष जाधव, माजी नगरसेवक गोविंद वाडकर, परिक्षक कुणाल मसाले, कृृष्णा सावळ, सतिश पाटणकर, सानिका पडवळकर, वैभव केंकरे, प्रशांत मोरजकर आदींचा सन्मान करण्यात आला. यावेेळी सहसचिव सचिन मोरजकर, खजिनदार श्रेयस मुंज, सदस्य निरंजन सावंत, अनिकेत आसोलकर, आनंद काष्टे, निखिल माळकर, सौ.सावली पाटकर, प्रशांत सावंत, हेमंत पागंम, सौ. आर्या टेंबकर, ओम टेंबकर, सौ. आराध्या मोरजकर, भालचंद्र लांबर, मृणाल पावसकर, प्रणव तारी, सिध्देश नेरुरकर, हर्ष जाधव, अक्षय माशाळ, सौ.अंकिता काष्टे, शंशाक काष्टे आदी उपस्थित होते.