स्पर्धकांच्या मनात कथा रुजायला हवी : डॉ. जी. ए. बुवा

Edited by: विनायक गावस
Published on: October 31, 2023 13:17 PM
views 79  views

सावंतवाडी : श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी या संस्थेत स्व. कमलताई विरनोडकर यांनी त्यांचे वडील स्व. गोविंद गणेश विरनोडकर यांच्या स्मरणार्थ ठेव ठेवलेल्या रकमेच्या व्याजातून कथा कथन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. तसेच श्रीराम वाचन मंदिराच्यावतीने निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते निबंध लेखन स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धकांसाठी खुली ठेवण्यात येते. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी संथेचे उपकार्याध्यक्ष डॉ. जी. ए. बुवा यांनी कथा कथन ही एक कला असून स्पर्धकांच्या मनात कथा रुजायला हवी असे उदगार काढले. कथा कथन स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यातील एकूण २० स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे परीक्षण सौ. महाश्वेता कुबल यांनी केले. गुणानुक्रम पुढील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. गट क्र. १ :- इयत्ता पहिली ते दुसरी -कु. दक्ष तुपार वालावलकर (सुधाताई कामत शाळा नं. २, सावंतवाडी) प्रथम क्रमांक, कु. मैत्री अमित वेतोरकर (सावंतवाडी एज्यु. सोसायटी, सावंतवाडी) द्वितीय क्रमांक, कु. अथर्व रोहिदास पंदारे ( मिलाग्रीस प्रा. शा. सावंतवाडी) तृतीय क्रमांक


गट क्र. २ :- इयत्ता - तिसरी ते चौथी कु. साईराज शैलेश पई (सावंतवाडी एज्यु. सोसायटी, सावंतवाडी ) प्रथम क्रमांक, कु. जान्हवी अशोक मेस्त्री (जि.प.प्रा. शाळा कारिवडे नं. २) द्वितीय क्रमांक ३) कु. यश प्रवीण सावंत ( मदर क्वीन प्रा. शाळा, सावंतवाडी) तृतीय क्रमांक पटकावला.समारोप प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रसाद पावसकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आज काल मुलांमध्ये वाचन अभिरुची घटत आहे. मूल्य संस्कृती हरवत चालली आहे. यासाठी अश्या संघर्षाची आवश्यकता स्पष्ट केली. या वर्षी श्रीराम वाचन मंदिर तर्फे आयोजित करण्यात आलेल्या निबंध लेखन स्पर्धेतील खालील विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.श्री. संजय शिवाजी तांबे (फोंडाघाट, ता. कणकवली) द्वितीय क्रमांक, श्री. संजीव आत्माराम राऊत (जामसंडे, ता. देवगड ) तृतीय क्रमांक, श्री. नियोजिता अनिल नाईक ( माजगाव, ता. सावंतवाडी) उत्तेजनार्थ प्रथम, कु. हिमानी श्रीराम धोंड (सावंतवाडी) उत्तेजनार्थ द्वितीय पटकावला.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व प्रास्ताविक ग्रंथपाल श्री. महेंद्र पटेल यांनी केले. स्पर्धेचे संचालन सहा. ग्रंथपाल सौ. रंजना कानसे यांनी केले स्पर्धा यशस्वी होण्यासाठी श्री. महेंद्र सावंत व श्री. गुरुप्रसाद वाडकर यांनी विशेष परिश्रम घेतले.