'त्या' खून प्रकरणातील आरोपीचा पोलीस कोठडीतला मुक्काम वाढला

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: August 06, 2023 18:25 PM
views 619  views

वैभववाडी : सोनाळी वाणी वाडी येथील जयश्री रामदास साटम या महीलेच्या खूनप्रकरणी अटकेत असलेल्या सचिन निखार्गे याला आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी वाढवून दिली आहे.

   सोनाळी येथे राहणाऱ्या जयश्री यांचा मंगळवार दि.१ऑगस्ट राहत्या घरी निर्घृणपणे खून करण्यात आला होता.घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांवरून येथील सचिन निखार्गे याला अटक करण्यात आली होती.त्याला सुरवातीला पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. ही कोठडी आज संपली. आज ता.६ त्याला न्यायालयात हजर केले. पोलीसांनी न्यायालयात आरोपी सहकार्य करीत नसल्याचे सांगत खूनासाठी वापरलेले हत्यारही अजूनही सापडलेलं नाही .याकरिता कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी केली. पोलीसांच्या मागणीनुसार न्यायालयाने पुन्हा तीन दिवसांची कोठडी वाढवून दिली आहे.