सिंधुदुर्गचा सुपुत्र हरियाणा राज्यात उच्च अधिकारीपदी विराजमान...!

Edited by:
Published on: March 26, 2024 14:21 PM
views 290  views

देवगड : देवगड तालुक्यातील महाळूंगे येथील ओंकार हरिकृष्ण राणे याने हरियाणा लोकसेवा आयोगाच्या  परिक्षेत  उत्तीर्ण होऊन त्याची वयाच्या  २७ व्या वर्षी  हरियाणा राज्यात उद्यान विकास अधिकारी पदी निवड झाली आहे. जिद्द चिकाटी व मेहनतीमुळे त्याने हे यश संपादन केले आहे. सिंधुदुर्ग जिल्यातून त्याची ही एकमेव निवड आहे.

ओंकार राणे हे शेतकरी कुटूंबातील असून त्याचे प्राथमिक शिक्षण जि.प.महाळुंगे शाळेत झाले.त्यानंतर  पुढील शिक्षण त्याने फणसगाव व कासार्डे येथे घेतले. त्यास लहानपणापासून शेतीची आवड असल्याने सन २०१८मध्ये कुडाळ तालुक्यातील मुळदे येथील उद्यान विद्या महाविद्यालयात कृषी  विषयात  पदवी प्राप्त केली.तसेच सन २०२१ मध्ये लुदीयांना येथील पंजाब  कृषी विशवविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण  घेतले.त्यानंतर सन २०२३ मध्ये हरियाणा राज्यातील चंदिगड- पंचकुला येथे हरियाणा लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली व जानेवारी २०२४ मध्ये  उत्तीर्ण होऊन गुणवत्तेवर नुसार त्याची हरियाणा येथे उद्यान  विकास  अधिकारी ( हॉर्टीकल्चर डेव्हलपमेंट ऑफिसर ) पदी निवड झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्याची हि  एकमेव निवड आहे.सध्या त्याचे हरियाणात प्रशासकीय कारभाराबाबत  प्रशिक्षण सुरु आहे. त्यास  चुलते दिनेश राणे यांची प्रेरणा व  मार्गदर्शन लाभले.

ओंकार याने आपणास मिळालेले यश हे जिद्द, चिकाटी व मेहनतीने तसेच  आई-वडिलांच्या आशीर्वादाने मिळाले असल्याचे सांगितले. त्याचे आई- वडील शेतकरी आहेत  खडतर परिश्रमातून यश मिळवायचे असेल तर कुठल्याही परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठता येते.अशा  शेतकरी कुटूंबातील ओंकार  राणे यांने मिळविलेले यश हे इतर तरुणांना प्रेरणा देणारे आहे. आपल्या मुलाने प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. असे मत त्याच्या वडिलांनी सांगितले. त्याच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत  आहे.