सयाजीराव गायकवाड महाराज , शाहू महाराज यांच्याच तोडीचे सामाजिक व शैक्षणिक काम बापूसाहेब महाराज - श्रीमंत शिवरामराजे भोंसले यांनी केले : डॉ. केशव तुपे

Edited by: विनायक गावस
Published on: August 13, 2023 18:51 PM
views 140  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचा 'संस्थापक दिन' आज महाविद्यालयामध्ये साजरा करण्यात आला.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत 

शिवरामराजे भोंसले यांचा जन्मदिन 'संस्थापक दिन' म्हणून साजरा केला जातो. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले  यांनी भूषविले. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब श्रीमंत शुभदादेवी भोंसले, संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले, संस्थेचे  कार्यकारिणी सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,डॉ. सतीश सावंत, संचालक प्रा. डी टी देसाई ,सहसंचालक  अॅड. शामराव सावंत, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी  कोकण विभागीय  उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. केशव तुपे, महाविद्यालयाचे प्राचार्य 

डॉ. डी एल भारमल, सामाजिक कार्यकर्ते श्री वसंतराव  तथा अण्णा केसरकर , अॅड.नकुल पार्सेकर, प्रा. अन्वर खान , श्री भरत गावडे, सुभाष देसाई,  चित्रकार श्री दादा मालवणकर, भाई देऊलकर, पी.पी देसाई, मंगेश तळवणेकर, श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचा सर्व प्राध्यापक वर्ग, राजमाता सत्वशीलादेवी भोंसले जुनिअर कॉलेज, श्री पंचम खेमराज लॉ कॉलेज, मदर क्विन्स इंग्लिश मीडियम स्कूल या  सर्वं  शिक्षणसंकुलातील शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजेसाहेब श्रीमंत शिवरामराजे भोंसले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख अतीथींचा शाल ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल यांनी केले.त्यानी   महाविद्यालयाच्या एकूण प्रगतीचा आढावा घेतला.     

मदर क्विन्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थी कु. विभव राऊळ याने राजेसाहेब श्रीमंत शिवरामराजे भोंसले यांचा जीवन परिचय सांगितला.      याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री वसंतराव केसरकर  व प्रा. अन्वर खान यांनी 

राजेसाहेबांच्या आठवणी विशद केल्या.विविध विषयांचे चौफेर ज्ञान असलेले राजेसाहेब म्हणजे चालता बोलता ज्ञानकोशच होता.ते जनतेचे राजे होते असा उल्लेख त्यांनी केला.

कार्यक्रमाचे प्रमुख  अतिथी डॉ.केशव तुपे यांनी नवीन शैक्षणिक धोरण याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले.भारत देशामध्ये पुर्वी शिक्षणाची उत्तम परंपरा होती, गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिले जायचे.भारत देश शिक्षणामध्ये खूप पुढारलेला होता.तक्षशिला, नालंदा सारखी जगातली पहिली विद्यापीठे भारतामध्ये होती. परंतु परकीय आक्रमण व इंग्रजांचे आगमन यामुळे येथील पारंपरिक शिक्षण पद्धतीला खिळ बसली व कारकून निर्माण करणारे शिक्षण इंग्रजानी सुरू केलं.या शिक्षणामधून गेली 200 वर्ष जे विद्यार्थी निर्माण झाले ते इंग्रजांनी येथे रुजवलेल्या शिक्षण पद्धतीचा परिपाक होता.  

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्याला हवे असलेले शिक्षण, प्रशिक्षण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मिळणार आहे.भारतीय परंपरा, भारतातील प्राचीन शिक्षण पद्धती याचा आदर ठेवून  स्वतःची शिक्षण पद्धती रुजवण्याचा या शैक्षणिक धोरणाचा उद्देश आहे .त्याचा निश्चितच फायदा नव्या पिढीला होणार आहे यातूनच आपला देश महासत्तेकडे वाटचाल करेल असे ते म्हणाले. 

जॉन मॅकॅलो या ब्रिटीश अधिकारयाने  भारतातील शिक्षण पद्धतीमध्ये बदल केल्याशिवाय येथे आपण राज्य करू शकणार नाही असा अहवाल  दिला होता. त्यानुसार येथील  शिक्षण पद्धतीमध्ये बदल करून इंग्रजांना अपेक्षित असलेली शिक्षण पद्धती त्यांनी राबवली.हे शिक्षण बेकारी निर्माण करणारे.भारतीय भाषांना कमी लेखनारे व  इंग्रजी भाषेचा पुरस्कार करणार शिक्षण आज पावेतो दिले गेले.नवीन शैक्षणिक धोरणामुळे या सर्व पद्धतीत बदल करून देशाबद्दल स्वाभिमान बाळगणारे शिक्षण नव्या पिढीला दिले जाणार आहे.अशी माहिती कोकण विभाग उच्च शिक्षण सहसंचालक डाॅ केशव तुपे यांनी दिली. 

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले यांनी सांगितले की  श्रीमंत सयाजीराव गायकवाड व राजर्शी शाहू महाराज हे सावंतवाडी संस्थांनचे अत्यंत जवळचे नातेवाईक  होते. त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक सुधारणांचा प्रभाव आमच्या संस्थानवर राहीलेला आहे .  या शैक्षणिक संकुलामध्ये दिले जाणारे शिक्षण हे विद्यार्थ्यांचे करियर घडविण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे .विद्यार्थ्यांनी याचा लाभ  घ्यावा व येथे निर्माण झालेल्या उच्च शिक्षणाच्या सुविधा त्यांनी घ्याव्यात असे आवाहन केले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली टाकाऊतून टिकाऊ, इको फ्रेंडली मॉडेलच्या प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डाॅ.सौ. प्रगती नाईक यांनी केले तर आभार डॉ. यू आर पवार यांनी मानले.