हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजणार ?

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 19, 2023 18:37 PM
views 33  views

नागपूर : हिवाळी अधिवेशन बुधवार २० डिसेंबर रोजी संपण्याची शक्यता आहे. अंतिम आठवडा प्रस्ताव सादर झाला आहे. राज्य शासनाच्या हालचाली बघता नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनाची सांगता बुधवारी होण्याची शक्यता आहे. विरोधकांनी शेतकऱ्यांच्या आणि विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी किमान दोन दिवसांनी वाढवण्याची मागणी केली आहे. पण अधिवेशन सुरू असताना ज्या विषयावर जास्त बोलले नाही त्या विषयावर विरोधक आता नव्याने काय बोलणार ? असा प्रश्न सत्ताधारी गटाकडून उपस्थित केला जात आहे.