महामार्गावर भीषण अपघातांची मालिका सुरूच | एकाचा मृत्यू

Edited by: भरत केसरकर
Published on: August 21, 2023 12:00 PM
views 2817  views

कुडाळ : मुंबई - गोवा महामार्गावर पावशी ग्रामपंचायतनजीक आज सकाळी दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य एक जखमी आहे. प्राप्त माहितीनुसार, महामार्गावर पावशी ग्रामपंचायत येथील मिडलकटमधून दुचाकी नेत असताना दुचाकीची धडक भरधाव कारला बसली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी कुडाळ येथे नेण्यात आले. मात्र, दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अन्य एक जखमी असून त्याला ओरोस येथे रुग्णालयात नेण्यात आले आहे. हा अपघात अनधिकृत मिडलकटमुळे हा अपघात झाला असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमधून होत आहे.