आंबोली घाटात दरड कोसळण्याचा सिलसिला सुरूच

Edited by: विनायाक गावस
Published on: July 26, 2023 09:21 AM
views 666  views

सावंतवाडी : आंबोली घाटात दरड कोसळण्याचा सिलसिला सुरूच आहे‌. घाटात मुख्य धबधब्यापासून 3 कि.मी वर खालच्या बाजूला भलामोठा दगड  कोसळला आहे. सध्यस्थितीत घाटातून एकेरी वाहतूक सुरू असून सुदैवानं कोणत्याही प्रकारची हानी घडली नाही. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली आहे. वारंवार होणारी घाटातील पडझड पाहता शासनाने वेळीच सावध होण व उपाययोजना करणं आवश्यक आहे.