
महाड-रायगड : मुंबई गोवा महामार्गावर दासगावजवळ चार वाहनांचा अपघात झाला आहे. महाडच्या दिशेने जाणारी ऑटोरिक्षा (क्रमांक MH-06-Z-4904) त्यामागे असलेला बाईक स्वार (क्रमांक MH-06-AV-769) व मोठा ट्रक आणि मुंबईच्या दिशेने पोलादपूर येथे जात असणाऱ्या कार (क्रमांक MH-05-ED-7974) या कार चालकाने प्रथम ऑटो रिक्षा नंतर बाईकला ठोकून मोठ्या ट्रकवर ही कार आदळली. यामध्ये ऑटो रिक्षा चालकास व बाईक चालकास मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे.
रिक्षा चालक शिवाजी कासरेकर (वय 52 गाव नागाव, गोरेगाव,माणगाव) यांना गंभीर दुखापत झाली आहे. फोर व्हीलरमधील एक छोट्या मुलीस मार लागलेला असून ती सुखरूप आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन व आपदा मित्र दाखल झाले असून वाहतूक सुरळीत चालू आहे.