
वैभववाडी : तालुक्याच मुख्य बसस्थानकाच रोटरी क्लब ऑफ वैभवाडीच्यावतीने सुशोभीकरण करण्यात आले. संपुर्ण बसस्थानकाला रंगकाम केले. यामुळे बसस्थानकाला नविन झळाळी आली आहे.
शहरातील बसस्थानकाचा रंग जीर्ण झाला होता. या बसस्थानकाला वैभववाडी रोटरी क्लबने रंगकाम करून झळाळी आणली आहे. रोटरी गव्हर्नर व्यंकटेश देशपांडे यांनी आज या बसस्थानकाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, रोटरी क्लब वैभववाडीचे सर्व उपक्रम मी नेहमी पाहत असून नवीन क्लब असूनही त्यांनी प्रत्येक क्षेत्रात केलेले काम आणि करत असलेले कार्य हे इंटरनॅशनल रोटरीला अभिप्रेत असलेलेच कार्य असून ते गौरवास्पद आहे. प्रेसिडेंट संतोष टक्के आणि त्यांच्या सहका-यानी रोटरी क्लब ची प्रतिमा उंचावण्यासाठी अतिशय चांगले सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्याची दखल इंटरनॅशनल रोटरीने घेतली असल्याचे सांगितले.
एसटी महामंडळाच्या वतीने नियंत्रक श्री.रावराणे यांनी गव्हर्नर देशपांडे यांना पुष्पगुच्छ देऊन एसटी बस स्थानकाचे सुशोभीकरणाचे काम केल्याबद्दल आभार मानले. रोटरी क्लबने एसटी बस स्थानक सुशोभित करून सामान्य प्रवाशांसाठी समाधानकारक कार्य केले असल्याचे सांगितले.
यावेळी फस्ट लेडी सौ. देशपांडे, प्रेसिडेंट संतोष टक्के, असिस्टंट गव्हर्नर दीपक बेलवलकर , नगराध्यक्षा नेहा माईनकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, बांधकाम सभापती बबलू रावराणे, पोलीस निरीक्षक अमित यादव, रोटरी क्लब सेक्रेटरी संजय रावराणे, सूर्यकांत धावले, सचिन रावराणे, मुकुंद रावराणे, महेश संसारे, सुरेंद्र नारकर, मनोज सावंत, शरद नारकर , तेजस आंबेकर, सुनील कुंभार, सुनील रावराणे, सलोनी टक्के, नंदिनी रावरणे, श्रेया धावले, संजना रावरणे, प्रा.नामदेव गवळी ,नितीन बांदेकर, मंदार चोरगे, आदी रोटेरियन व प्रवासी उपस्थित होते.