

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी अर्थात शांलात परीक्षेचा सावंतवाडी तालुक्याचा निकाल ९८.६१ टक्के लागला आहे. सावंतवाडी तालुक्यातून दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या १७२७ विद्यार्थ्यांपैकी १७१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात ९३६ पैकी ९२३ विद्यार्थी तर ७९१ पैकी ७८७ विद्यार्थिनींचा समावेश आहे. यामध्ये तालुक्यात मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडीचा चैतन्य गावडे ९९ टक्के गुण मिळवत प्रथम आला आहे. तर कळसूलकर इंग्लिश स्कूलचा पार्थ वाडकर ९७.८० टक्के गुण मिळवत द्वितीय, तर मळगाव हायस्कूलची सुचित्रा धुरी ९७.६० टक्के गुण मिळवीत तालुक्यात तिसरी आली आहे.
राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडीचा दहावीचा निकाल ९९.२६ टक्के लागला असून तालुक्यामध्ये उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखलेली आहे. राणी पार्वतीदेवी हायस्कूल मधून एकूण १३६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते आणि १३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रशालेतून पारस प्रसाद दळवीन ९६.८० टक्के गुण मिळवून प्रथम , वैष्णवी पुनाजी धुमक ९६.६० टक्के गुण मिळवून द्वितीय व लता महेश परब हिने ९६.४० टक्के गुण मिळवून प्रशालेत तृतीय क्रमांक पटकाविला आहे. मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडीचा शालांत परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. प्रशालेतून चैतन्य प्रदिप गावडे ९९ टक्के गुण मिळवत प्रथम, शार्दूल दिपक बागवे ९७.२० टक्के गुण मिळवत द्वितीय तर तन्मय प्रसाद राणे ९६.४० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. कळसुलकर इंग्लिश स्कूलचा निकाल ९६.७२ टक्के लागला आहे. यात प्रथम क्रमांक पार्थ राजेश वाडकर ९७.८० टक्के गुण मिळवत प्रथम, नेहा संजय बागल ९७ टक्के गुण मिळवत द्वितीय तर विधी विक्रम कोटणीस हीन ९६.६० टक्के मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान सावंतवाडी संचलित शांतिनिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल, सावंतवाडी या प्रशालेतील १० वीचा निकाल १०० टक्के लागला असून प्रांजल पांडुरंग भुसानावर ९६.६० टक्के गुण मिळवत प्रथम. सिद्धेश अरुण गावडे, किंजल अविनाश पै ९५.२० टक्के मिळवत द्वितीय तर प्रीती रामा गावडेनं ९४.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. मळगाव हायस्कूल मळगावचा दहावीचा निकाल लागला १०० टक्के लागला असून सुचित्रा सत्यविजय धुरी ९७.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केलाय. द्वितीय शिवम दिपक जोशी, रिया रमेश नाईक, वृषाली सिताराम कुंभार ९३.४० टक्के तर तृतीय ९०.२० टक्के गुण मिळवत सिद्धी गावडे हीन प्राप्त केला आहे. श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगावचा निकाल ९७ टक्के लागला आहे. यात धनश्री वासुदेव नाटेकर ९३ टक्के गुण मिळवत प्रथम, वेदांत संदीप माजगांवकर ९२.२० टक्के द्वितीय तर हर्ष गजानन धुरी ९० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.सेंट्रल इंग्लिश स्कूल सावंतवाडीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात काशिराम विठोबा पालव यान ९१.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. सिद्धी नारायणसिंग पुरोहित ८८.६० टक्के द्वितिय, राज नारायण माणगांवकर ८७.४० टक्के गुण मिळवत तृतिय क्रमांक पटकविला आहे.
महात्मा गांधी विद्यामंदिर हायस्कूल सातार्डा माध्यमिकचा निकाल ८५.७१ टक्के लागला आहे. यात तन्वी केरकर हीन ८५ टक्के गुण मिळवत प्रथम, भावेश मेस्त्री ८३.२० टक्के गुण मिळवत द्वितीय, रिया जाधव ८०.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला. माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्लीचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक अभिषेक विकास जेठे यान ८९.६० टक्के गुण मिळवत प्राप्त केला.द्वितीय क्रमांक गायत्री बापू निर्गुण ८८.८० टक्के, तृतीय क्रमांक पूर्वा दशरथ गावकर ८७.२० टक्के गुण प्राप्त केला आहे. कलंबिस्त इंग्लिश स्कुलचा निकाल १०० टक्के लागला आहे. श्रुती प्रसाद कुडतरकर ९२.४० टक्के गुण मिळवत प्रथम तर करिष्मा राजेश पास्ते ९२.२० टक्के द्वितीय तर मधुकर महेश पास्तेन ९१.२० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९८.३३ टक्के एवढा लागला. यात प्रथम क्रमांक विष्णू सोनू करमळकरनं ९१.८० टक्के गुण मिळवत प्राप्त केला. द्वितीय देवश्री जयवंत वेंगुर्लेकर ९१ टक्के तृतीय क्रमांक अमोल सुरेश नाईकने ८८.८० टक्के गुण मिळवत प्राप्त केला. आरोंदा हायस्कूलमध्ये पार्थ केरकर यान ९४.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय विशाल शेटकर ९१.२० टक्के तर तृतीय क्रमांक सगुण शेटकर, मिताली मातोंडकर यांनी ८४ टक्के गुण मिळवत प्राप्त केला आहे. माध्यमिक विद्यालय माडखोलमध्ये प्रथम क्रमांक वैष्णवी बमू वरक ८७.६० टक्के गुण मिळवत प्राप्त केला. द्वितीय भक्ती आडेलकर ८३.४० टक्के तर वेदीका माडखोलकर ८३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, सांगेलीचा निकाल १०० टक्के लागला असून मानसी तुळशीदास मुरकर ९२.६० टक्के प्रथम, द्वितीय लक्षद्धी सचिन सावंत ९२.४० टक्के तर तृतीय दत्ताराम संतोष सावंत ८९.२० टक्के गुण मिळवत प्राप्त केला आहे.
आरोस पंचक्रोशी विद्याविकास हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला असून उज्वला उमेश रेडकर ९३.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला . व्दितीय क्रमांक चिन्मयी बाळकृष्ण गोवेकर ८७ टक्के तर प्रतिक्षा राजाराम कुबल ८६ . ८० टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे. सेंट्रल उर्दू हायस्कूलमध्ये शेख फुरकान अहमद हारून अहमद ९३.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. द्वितीय जरी अल्फिया इरफान ८३.८० टक्के तर शाह हफसा अब्दुल्ला हीन ८३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. विलवडे येथील राजा शिवाजी विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. प्रशालेतून प्रथम सानिका सोनू दळवी ९३.२० टक्के, द्वितीय सानिका लक्ष्मण दळवी ९०.४० टक्के, तृतीय अनुजा विनायक दळवी ९०.८० टक्के प्राप्त केले. ओटवणे येथील श्री रवळनाथ विद्यामंदिर या प्रशालेचा निकाल ९६.५५टक्के लागला असून प्रशालेमधून करिश्मा मिलिंद राणे या विद्यार्थिनीने ९३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला तर रेश्मा चंद्रकांत नाईक ९१.२० टक्के व सानिका विश्वनाथ भिसे ८८.४०टक्के गुण मिळवत अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. आंबोली येथील युनियन इंग्लिश स्कुल आंबोली या प्रशालेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून प्रथम दिपाली दत्ताराम झेंडे ९३ टक्के गुण द्वितीय वैष्णवी ऊत्तम पारधी ९२.४० टक्के गुण आणि तृतीय प्रिया सुहास जोशी ८९ टक्के गुण प्राप्त केले. पावणाई खळनाथ विद्यामंदिर शिरशिंगेचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रणाली दिपक राऊळनं ८४ टक्के गुण मिळवत प्रथम, द्वितीय सुजन सुमंत राऊळ ८२ टक्के तर बावली रमेश चव्हाणनं ८०.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. कै. बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालय, दाणोलीचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात सरिता धोंडू पाटील ८९.८० टक्के प्रथम, नरेंद्र रघुनाथ सावंत ८९.२० टक्के द्वितीय, तृतीय राधिका सुरेश मोरजकर ८७.४० टक्के यान प्राप्त केला. संस्कार नॅशनल स्कूल निरवडे या प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक समर्थ दत्तात्रय भिसे ९० टक्के, द्वितीय क्रमांक रघुनाथ गोविंद मठकर ८९ टक्के, तृतीय क्रमांक दिव्यांक केशव परब ८६.८० टक्के प्राप्त केले.
तळवडे येथील जनता विद्यालय हायस्कूलचा बारावीचा निकाल ९५.५८ टक्के लागला आहे. यात प्रथम क्रमांक सुहानी महादेव गावडे ९३ टक्के द्वितीय क्रमांक विशाखा विजय परब ८७.८० टक्के द्वितीय क्रमांक चित्रांग श्रीकृष्ण मालवणकर ८७ टक्के आणि तृतीय क्रमांक मोहन अविनाश गावडे ८६.२० टक्के गुण प्राप्त करत पटकवला. नूतन माध्यामिक विद्यालय इन्सुलीत प्रथम कमांक प्रतिक राजन गावकर ९४ टक्के व्दितीय प्राचि गोविंद सावंत ९१ टक्के तृतीय हर्षा आनंद राणेन ८९ टक्के प्राप्त केले. कोलगाव माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९२.८५ टक्के लागला. यात प्रथम क्रमांक अंजली गोविंद सावंत ९१ टक्के गुण मिळवत प्राप्त केला आहे. द्वितीय मानसी सिताराम राऊळ ८३.२० टक्के तर तृतीय आकांक्षा बाबुराव कदम ७९.४० टक्के गुण मिळविले आहे. चौकुळ इंग्लिश स्कूलमध्ये प्रथम क्रमांक राजन शिवाजी गावडे ९२.४० टक्के, अनुष्का सत्यवान गावडे ९० टक्के द्वितीय तर अनुष्का रामा गावडे हीन ८८ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदा प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रशालेतून प्रथम निशांत महेश नाईक ९६.८० टक्के, द्वितीय कौस्तुभ राजेश सावंत ९४.६० टक्के, तृतीय ईशिता जितेंद्र सावळ ९४.२० टक्के प्राप्त केले. व्ही. एन. नाबर इंग्लिश स्कूल, बांदाचा शालांत प्रमाणपत्र परिक्षा निकाल शंभर टक्के लागला आहे. प्रशालेतून प्रथम मधुरा जगदिश पाटील ९६.८० टक्के, द्वितीय अनुष्का अविनाश पंडित ९५.६० टक्के, तृतीय नंदिनी नितीन धुरीन ९२.६० टक्के मिळवले. श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय असनीयेचा या वर्षीचा १०विचा निकाल १००टक्के लागला असून नेहा सहदेव गावडे ९२.४०टक्के गुणांसह प्रथम , हर्षला हेमंत सावंत ९२.२०टक्के गुणांसह द्वितीय तर प्रतीक्षा लक्ष्मण सावंत ८६.६०टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकाविला. कुणकेरी हायस्कूल चा निकाल ९५ टक्के लागला आहे. तन्वी सुरेश गावडे ८७.४० टक्के प्रथम, अमिषा प्रकाश सावंत ८०.८० टक्के द्वितीय, तृतीयआकांक्षा अजित दळवी ७९.२० टक्के प्राप्त केले. सावंतवाडी आंबोली पब्लिक स्कूल विद्यानिकेतनचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात प्रथम अंकिता पाटील ९० टक्के द्वितीय स्नेहल शिंदे ८६ टक्के तृतीय आदित्य पेडणेकर ८२ टक्के मिळून यशस्वी झाले. आंबोली येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. तनुष गुरुनाथ राऊत ९३. ८० टक्के गुण मिळवून आंबोली केंद्रातून व शाळेतून प्रथम आला. कॅडेट नाईक गौरेश शिवानंद ८९. ६० टक्के गुण मिळवून द्वितीय तर कॅडेट पांचाळ नील अरविंद ८५. ६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकांचे मानकरी ठरले. विद्या विहार इंग्लिश स्कूलचा निकाल १०० टक्के लागलाय. श्वेता सुरेश मडुरकर 91. 02 टक्के गुण घेत शाळेतून पहिली आलीय. अंकिता महेंद्र मोरजकर 90. 08 टक्क्यांसह दुसरी आलीय. लावण्या संतोष पिंगुळकर 90. 02 टक्के गुण मिळवत तिसरी आलीय. न्यू इंग्लिश स्कूल, मडुरा हायस्कूलचा निकाल ९८ टक्के लागला आहे. प्रशालेतून प्रथम निभाना नारायण पंडीत ८७.८० टक्के, द्वितीय विनिता सोमा नाईक ८५ टक्के, तृतीय ईशा रुोेश गवंडी ८४.४० टक्के प्राप्त केले. मळेवाड पंचक्रोशी हायस्कूल मळेवाडमध्ये अंकुर शैलेश पाटलेकर ७७.४० टक्के प्रथम, शुभम विजय मेस्त्री ७७ टक्के द्वितीय, भगवान तुळशीदास गावडे ७६.६० टक्के तृतीय क्रमांक प्राप्त केला.