दोडामार्ग तालुक्याचा निकाल ९९.४४ टक्के

Edited by:
Published on: May 27, 2024 14:36 PM
views 158  views

दोडामार्ग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यात दोडामार्ग तालुक्याचा निकाल ९९.४४ टक्के लागला असून नुतन विद्यालय कळणे या प्रशालेची विद्यार्थीनी पालवी लक्ष्मण मेस्त्री याने ९५.८० टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक येण्याचा मान मिळविला आहे. करुणा सदन इंग्लिश मीडियम स्कूल साटेली-भेडशी या प्रशालेची विद्यार्थिनी सानिया रौफेल फर्नांडिस ९४.६० टक्के गुण मिळवत द्वितीय तर शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे या प्रशालेची विद्यार्थिनी अनया संतोष गवस ९४.४० टक्के गुण मिळवत तालुक्यात तृतीय आले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

तालुक्यातील एकूण १६ प्रशालांपैकी १४ प्रशालांचा निकाल १००  टक्के लागला आहे. तालुक्यातून एकूण ३५८ विद्यार्थी दहावीच्या परिक्षेस बसले होते. पैकी ३५६ विद्यार्थी पास झाले आहेत. तालुक्यातील शाळानिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विद्यार्थी पुढिलप्रमाणे,

१) नूतन विद्यालय कळणे १०० टक्के, प्रथम पालवी लक्ष्मण मेस्त्री ९५.८०टक्के, द्वितीय सायली शाम गवस ८०.८०टक्के व तृतीय गौरी गंगाराम जंगले ७९.६० टक्के

२) करुणा सदन इंग्लिश मीडियम स्कूल साटेली-भेडशी-१०० टक्के, प्रथम सानिया रौफेल फर्नांडिस ९४.६०टक्के, द्वितीय सेजल संतोष कदम ९४.२०टक्के व तृतीय कोमल परेश पांगम ९४ टक्के

३) शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे १०० टक्के, प्रथम अनया संतोष गवस ९४.४०टक्के अभिषेक कृष्णा तळणकर ९०.८०टक्के व तृतीय समिधा सुंदर नाईक ८८ टक्के

४) दोडामार्ग इंग्लिश स्कूल दोडामार्ग १०० टक्के, प्रथम हार्दी राजन साळकर ९४.२०टक्के, द्वितीय आर्यन जालिंदर शेंडगे ९०.६०टक्के व तृतीय सुयश सुरेश राठोड ८९.८०टक्के

५) माध्यमिक विद्यालय सोनावल १०० टक्के, प्रथम शितल तुकाराम गवस ९३.८० टक्के, द्वितीय संचिता संतोष जाधव ९१टक्के व तृतीय जानवी संदीप दळवी ८१.६०टक्के

६) बापूसाहेब देसाई विद्यालय उसप १००टक्के, प्रथम भक्ती अनंत गवस ९३.४० टक्के, द्वितीय स्नेहा ज्ञानेश्वर रेडकर ८९.८०टक्के व तृतीय विभागून तेजस विजय गवस व श्रावणी कृष्णा गवस ८८.२०टक्के

७) न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भेडशी १०० टक्के, प्रथम अनुष्का नंदकिशोर म्हापसेकर ९१.८० टक्के, द्वितीय अर्बिता अनिल कुबल ८८.४०टक्के व तृतीय विभागून साक्षी रमेश गवस व शुभदा राजेश सुतार ८५.८०टक्के 

८) कीर्ती विद्यालय घोटगेवाडी १००टक्के, प्रथम विभागुन विघ्नेश धुरी व सुंदर बेर्डे ९१.२०टक्के, द्वितीय प्रथमेश सातार्डेकर ८८.२० टक्के व तृतीय विभागून अर्जुन देसाई व गौरव देसाई ८६ टक्के

९) एम आर नाईक विद्यालय कोनाळकट्टा १०० टक्के, प्रथम विश्रांती उदय केतकर ८७टक्के, द्वितीय तेजस्विनी रावजी लोंढे ८६.८०टक्के व तृतीय ऋग्वेद राजन लोंढे ८६.४०टक्के

१०) सरस्वती विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स कुडासे १०० टक्के, प्रथम मुरारी अशोक सावंत ८६.६० टक्के द्वितीय बाळा शंकर गवस ८५.६०टक्के व तृतीय प्रज्ञा देविदास सावंत ८०.२०टक्के

११) समाजसेवा हायस्कूल कोलझर १०० टक्के, प्रथम सानवी संजय सावंत ८३.६०टक्के, द्वितीय सुरज वासुदेव साळगावकर ७८.४०टक्के व तृतीय यश उल्हास कदम ७८.२०टक्के

१२) माध्यमिक विद्यालय झरेबांबर १०० टक्के, प्रथम साक्षी सुरेश चोर्लेकर ८०टक्के, द्वितीय राजेश गोरखनाथ गवस ७६टक्के व तृतीय वैभवी तानाजी गवस ७६टक्के

१३) माध्यमिक विद्यालय मांगेली १००टक्के, प्रथम सुजल सुनील गवस ७९.६० टक्के, द्वितीय अंकिता अर्जुन गवस ७८.२०टक्के व तृतीय तनवी राजन गवस ७१.८०टक्के

१४) माध्यमिक विद्यालय झोळंबे १००टक्के, प्रथम भक्ती विजय देसाई ७७ टक्के, द्वितीय सानिका सचिन राऊळ ७६टक्के व तृतीय साई सिंधू कुंभार ७२टक्के

१५) माध्यमिक विद्यालय माटणे ९५.२३टक्के, प्रथम साईश संतोष शिरोडकर ७३.२०टक्के, द्वितीय सोनिया उदय तिर्डीकर ७१.४०टक्के व तृतीय राजीव वरपत वळवी ६७.८०टक्के

१६) नवदुर्गा माध्यमिक विद्यालय आयी ८८.८८टक्के, प्रथम गौरेश कृष्णा सावंत ८४.२०टक्के, द्वितीय सोनाली सुभाष सावंत ८१.४० टक्के व तृतीय सेजल संभाजी सावंत ७६.६० टक्के