देवगड तालुक्याचा निकाल ९९.१२ टक्के | २४ शाळांचा निकाल १०० टक्के

Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 27, 2024 12:14 PM
views 142  views

देवगड : इयत्ता दहावीचा देवगड तालुक्याचा निकाल ९९.१२ टक्के एवढा लागला आहे. देवगड तालुक्यात १४८६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते.त्यापैकी  १४७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ४०६ जणांनी विशेष श्रेणी पटकावली आहे. तर ६५८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत ३४१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि ६८ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यातील 24 शाळांचा निकाल १००%टक्के लागला आहे.