
बांदा | भगवान शेलटे : शेर्ला - निगुडे रस्ता एप्रिल - मे महिन्याच्या दरम्यान करण्यात आला होता. मात्र, या रस्त्याचं काम सुरवातीपासूनच निकृष्ट असल्याच ग्रामस्थांनी वारंवार निदर्शनास आणून दिल होत. मात्र, याकडे ठेकेदार आणि सबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याच दिसून येत होत. याचा परिणाम आता पहिल्याचं पावसात दिसून येत आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे दिसून येत आहेत. तर एका लहान पुलावर रस्ता खचलेला आहे.
अपघात झाल्यास जबाबदार कोण..?
जिथं रस्ता खचला आहे त्या ठिकाणी वाहने वेगात आल्यास अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण असा संतप्त सवाल शिवसेना शाखाप्रमुख वैभव आरोसकर यांनी केला. या संदर्भात निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर यांनीही पत्राद्वारे याकडे लक्ष वेधलं होत.
या रस्त्याचं काम पूर्णपणे निकृष्ट झालं असून संबधित ठेकेदारावर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केलीय. त्यामुळे अशा ठेकेदारांना अधिकारी पाठीशी घालतात कि कारवाई करतात हे पहाव लागणार आहे.

दरम्यान, जिथं रस्ता खचून खड्डा पडला तिथं गावातील युवकांनी त्या खड्यात दगड माती टाकून तात्पुरती दुरुस्ती केलीय केली. मात्र, जनतेचा पैसा अशा पद्धतीने पाण्यात जात असेल तर हे दुर्दैवी असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केलीय.