
बांदा : 'नवी दिशा नवे उपक्रम' या राज्यस्तरीय समुहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ५० उपक्रशील शिक्षकांच्या 'नवी दिशा नवे उपक्रम' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा व उपक्रमशील शिक्षकांचा गुणगौरव सोहळा रविवारी पुणे येथे संपन्न होणार आहे.
संपादक देवराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, येथील सहाय्यक संचालक रमाकांत काठमोरे, माजी उपसंचालक विकास गरूड, उपप्रशासकीय अधिकारी शुभांगी चव्हाण, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी जयेश शेंडकर, विजय आधारे याचबरोबर शिवाजी खांडेकर, सचिन डिंगळे, बाळकृष्ण चोरमले, राजेश सुर्वे, सेवानिवृत्त शिक्षिका विजया महाडिक यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्र सेवादलाचे निळू फुले सभागृह, सानेगुरुजी स्मारक, सिंहगड रोड, पुणे येथे सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे.
सदर पुस्तकात जे. डी. पाटील, स्वाती पाटील (दोन्ही सिंधुदुर्ग), बळीराम जाधव, संतोष गवळी, प्रमिला गावडे, लता गवळी, जया कुलथे, सरला गावडे, किसन फटांगडे, सुनिता निकम (सर्व अहमदनगर), प्रदीप विघ्ने (नागपूर), दुर्वास राठोड (जळगाव), शंकर चौरे (धुळे), गितांजली माथनकर, नेहा गोखले, सीमा बोजेवार, हर्षदा चोपणे, चित्रा गोतमारे (सर्व यवतमाळ), रोहिणी गायकवाड (बीड), दिपाली लोखंडे, उज्वला फटांगरे, रफत इनामदार, सोपान बंदावणे, आयुब शेख, वसुधा नाईक, रुकसाना शेख, बंडोपंत नजन, विजय माने, झुंबर कदम, वनिता मस्कर, सुप्रिया चोरघे, वैशाली काळे, शितल मदने, तिरूमला माने, हेमलता चव्हाण, संगीता म्हस्के (सर्व पुणे), बापू चतुर (नाशिक), मीनल पाडावे (ठाणे), संजय पवार, स्मिता पाबरेकर (सर्व रायगड), सतीश मुणगेकर, सुहास दोरुगडे, रूपाली पाटील, विजय वाघमोडे, सदानंद कांबळे (सर्व रत्नागिरी), अनिता रहागंडाले (भंडारा), लता साळवे (औरंगाबाद), करुणा गावंडे (चंद्रपूर), वैशाली पाटील (पालघर), मिनाक्षी नागराळे (वाशिम) या ५० उपक्रमशील शिक्षकांच्या उपक्रमांचा समावेश या पुस्तकात आहे.