सोन्याचा भाव उतरला | बचतीत खरेदीची 'चांदी' !

Edited by:
Published on: June 23, 2023 12:22 PM
views 158  views

सिंधुदुर्ग : सोन्या आणि चांदीच्या दरवाढीला मोठा ब्रेक लागला आहे. फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान नवनवीन विक्रम नोंदवलेल्या सोन्या आणि चांदीच्या दरवाढीला मे महिन्यापासून लगाम लागला असून किंमतीत सतत घसरणीमुळे खरेदीदारांची चंगळ सुरू आहे. अशा स्थितीत भविष्यात होणारी अपेक्षित दरवाढ लक्ष घेऊन लोकही खरेदी करत आहेत. जागतिक बाजारात सोने-चांदी दबावाखाली असून त्याचा परिणाम भारतीय सराफा बाजारात झाला आणि किंमती ६० हजारांपेक्षा खाली आल्या आहे.

देशांतर्गत वायदे बाजारासह सराफा बाजारातही सोने-चांदीचा बभव गेल्या दोन महिन्यात झरझर खाली आला आहे. आज व्यावसायिक आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली असून सोन्याचे ऑगस्ट वायदे MCX वर ०.१६% किंवा ९१ रुपयांनी घसरून ५८,१३६ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यापार होते. विशेष म्हणजे जागतिक स्तरावरही शुक्रवारी सकाळी सोन्याच्या दरात घसरण झाली.

दुसरीकडे, आजच्या व्यवहार सत्राच्या सुरुवातीला चांदीची चमकही उतरली आहे. सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण झाली असून MCX वर जुलै २०२३ रोजी डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव १.१०% किंवा ७५३ रुपयांनी घसरून ६७,७८४ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होता


सराफा बाजारात सोने-चांदीचा भाव उतरला

गुडरिटर्न्स वेबसाइटवरील ताज्या माहितीनुसार २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोने तब्बल ४०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. २२ कॅरेट सोने कालच्या बंद भाव ५४,५०० रुपयांच्या तुलनेत ४०० रुपये स्वस्त होऊन ५४ हजार १०० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४४० रुपयांनी घसरून ५०,०२० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. दुसरीकडे चांदीच्या दरात प्रति किलो ५०० रुपयांनी घसरण झाली आहे.

जागतिक बाजारात सोने-चांदीची किंमत

शुक्रवारी सकाळी सोन्याच्या जागतिक किमतीत घसरण झाली. कॉमेक्सवर सोन्याची जागतिक वायदा किंमत ०.१५% किंवा $२.३० ने घसरून $१९२१.४० प्रति औंस झाली. त्याच वेळी, कोमेक्सवर चांदीचे जागतिक फ्युचर्स किंमत शुक्रवारी सकाळी १.३७% म्हणजे $०.३१ ने घसरून $२२.३६ प्रति औंस झाली.