
देवगड : परतीच्या पावसाचा फटका देवगड येथील भात शेतीला बसला. या पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचबरोबर शिरगाव परिसराला चक्रीवादळाचा तडाखा बसला असून राकसघाटी आणि निमतवाडी परिसरातील १२ घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
ठीक ठिकाणी पडझड
परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. त्याचबरोबर शिरगाव परिसराला चक्रीवादळाचा तडाखा बसला असून राकसघाटी आणि निमतवाडी परिसरातील १२ घरांचे मोठे नुकसान झाले आहे. वीजांच्या कडकडाटासह बुधवारी सायंकाळी ४ वाजल्यानंतर परतीच्या पावसाने झोडपले. प्रखर उन्हामुळे तापलेले वातावरण अचानक गार झाले. मात्र सायंकाळी अचानक वीजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा तडाखा शिरगाव भागाला बसला. देवगड-नांदगाव मार्गावर शिरगाव ग्रामपंचायतीजवळ मोठे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. जेसीबीच्या सहाय्याने अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर झाड बाजूला करून वाहतूक यावेळी सुरळीत करण्यात आली.
शिरगाव येथील ग्रामस्थ आणि वीज वितरण विभागाचे कर्मचारी यांनी झाड बाजूला करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. वीजांच्या कडकडाटासह पावसाची सुरुवात झाल्याने काही काळ वीजपुरवठा देखील खंडित झाला होता.