LIVE UPDATES

सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्यधिकारीपद पुन्हा एकदा रिक्त

Edited by: विनायक गांवस
Published on: June 06, 2025 20:49 PM
views 84  views

सावंतवाडी : न.प. मुख्यधिकारी अश्विनी पाटील यांची सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत उपायुक्तपदी बदली झाली आहे. या बदलीमुळे सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्यधिकारीपद पुन्हा एकदा रिक्त झाले आहे.

पाटील यांची केवळ दोन महिन्यांपूर्वीच सावंतवाडी येथे बदली झाली होती. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी प्रशासनावर अंकुश ठेवला होता. महत्त्वाच्या कामांसाठी प्रशासनाने काही उपक्रमही राबवले होते. मात्र, त्यांच्या विनंतीवरून सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत उपायुक्तपदी पुन्हा बदली करण्यात आली आहे. या अनपेक्षित बदलीमुळे सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारीपद रिक्त झाले आहे.