
सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील नाटळ या गावात गावकऱ्यांची मीटिंग आयोजित करण्यात आली होती. या मीटिंगमध्ये काही वैयक्तिक विषय धार्मिक, तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमासंदर्भात गाव पातळीवर चर्चा सुरू होती. पण यावेळी अचानक तेथे कणकवली पोलीस गेल्याने याला वेगळे वळण लागले अन लोकांना मनमोकळी चर्चा न करता ती चर्चा हमरी तुमरी पर्यंत गेली. अशावेळी पोलिसांनी वास्तविक हमरीतुमरीवर कारवाई करणे अपेक्षीत असताना 2 स्टार अधिकारी दिलेल्या खुर्चीवर बसून ती हमरी तुमरी पाहत होते. हे बघता हे अधिकारी एका पक्षाची बाजू घेत असल्याचे स्पष्ट होते. यानंतर या ग्रामस्थांच्या मीटिंगसाठी पोलिसांना कोणी बोलवले, अशी ग्रामस्थांची चर्चा सुरू झाली. त्यानंतर पोलिसांनी आपणाला पोलीस पाटील यांनीच बोलवलं असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली. गावकरी या पोलीस पाटलांवर अत्यंत नाराज असल्याची चर्चा आहे. .
वास्तविक पोलीस पाटलांनी गावातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ग्रामस्थांमध्ये समन्वय साधण्याची गरज होती. पोलीस पाटील यांनी जर पोलिसांना बोलवले नसते तर असा प्रकार घडला नसता. नुकतेच झालेली निवडणूक पाहता पोलीस पाटील यांनी पक्षीय बाजू घेऊन आपल्या ओळखीच्या नात्याच्या पोलिसांना बोलवलं की स्वतःच्या मनाने बोलवले असावे यावर आता गावातील ग्रामस्थांची चर्चा सुरू आहे.