
सावंतवाडी : येथील सुलभ शौचालयाची पाणी नसल्याकारणाने दैना झाली आहे. त्या भागातील नागरिक या सुलभ शौचालयाचा वापर करत असतात. मात्र पाणी नसल्याकारणाने त्या परिसरातील नागरिकांची मोठी पंचायत झाली आहे. याबाबत माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शौचालयाचा वापर करणारे तेथील काही नागरिक असून त्यांचे पाण्याविना हाल झालेत. माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी भेट देऊन त्या परिसराची पाहणी केली. तसेच शौचालयाची देखभाल करणाऱ्यांची भेट घेत विचारणा करत स्वच्छता नसल्याबद्दल जाब विचारला. तसेच त्या परिसरामध्ये आजूबाजूला खड्डे पडलेले असून लोकांना चालणं सुद्धा डेंजर झाल आहे. ती दुरुस्ती व्हावी, शौचालयाला पाणी नियमित मिळावं तसेच झाडलोट कचरा स्वच्छता नेहमीच व्हावी यासाठी स्वच्छता निरीक्षक वैभव नाटेकर यांना सुद्धा श्री भोगटे यांनी जाब विचारला. तसेच सदर शौचालयाची स्वच्छता व सुरळीतपणा आम्ही लवकरच करू असे श्री नाटेकर यांनी आश्वासन दिले. याबाबत लवकरच मुख्याधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे माजी नगरसेवक श्री. भोगटे यांनी सांगितलं