चिपळूण : मेरी मिट्टी मेरा देश या केंद्र सरकारच्या अभियाना अंतर्गत शहीद वीरांच्या सन्मानार्थ चिंचघरी ग्रामपंचायत हद्दीत बांधलेले शिलाफलक तोडफोड प्रकरणी आणि चिंचघरी ग्रामपंचायतीने केलेल्या मनमानी भ्रष्ट कारभार व फसवणुकीची चौकशी करावी, अशी मागणी चिंचघरी बौद्धवाडी येथील शहीद नायब सुभेदार वीर दत्ताराम लक्ष्मण कांबळे, यांचा नातू रोनीत पवार यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
पवार याने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिंचघरी ग्रामपंचायत हद्दीत बांधलेल्या शिलाफलक तोडफोड प्रकरणी रोनित पवार यांची आजी संगीता दत्तराम कांबळे वय वर्ष 85 यांनी केलेल्या दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी तक्रार केली होती . या तक्रारीबाबत सदर ग्रामपंचायतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी, यांना लेखी उत्तर दिले आहे. त्यामधील त्यांनी परिच्छेद ३ मध्ये लिहून दिले आहे की, ग्रामपंचायत ज्या जागेत आहेत त्या जागेचे ग्रामपंचायत अथवा जिल्हा परिषदेचे नावे बक्षीस पत्र झालेले नाही म्हणून त्यांचे स्वतःकडून सदर शिलाफलक तिथून काढण्यात आले होते. त्यांनी हे कबूल केले आहे. तिथून काढून जिल्हा परिषद शाळेच्या जागेत बांधकाम केले असे त्यांनी त्यामध्ये म्हटले आहे.
यावर श्री पवार यांचे म्हणणे आहे की, याच बक्षीस पत्र न झालेल्या वादग्रस्त जागेत शासकीय फंडातून लाखो रुपये निधी खर्च करून तिथे पक्की ग्रामपंचायत इमारत उभी केलेली आहे. आजूबाजूला संपूर्ण पेव्हर ब्लॉक बसवले आहेत. पक्क्या जांभा बांधकामाची कंपाउंड भिंत बांधलेली आहे, ही सर्व कामे ग्रामपंचायतच्या मालकीची किंवा बक्षिस पत्र झालेल्या नसलेल्या जमिनीत केली आहेत. मग यावर शासनचा निधी खर्च करता येतो का? असा सवाल सुद्धा रोनीत पवार यांनी निवेदनातून विचारला आहे.
मग असा खर्च करता येत असेल तर मेरी मिट्टी किंवा मेरा देश या केंद्र सरकारच्या अभियानांतर्गत शहीद वीरांच्या सन्मानार्थ ग्रामपंचायत शिलाफलक का बांधता येत नाही. जर ग्रामपंचायत अथवा जिल्हा परिषद यांचे नावे बक्षीस पत्र झालेले नाही असे असल्यास त्या जागेवर ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी व इतर खर्च आणि केंद्र शासन दरबारी खोटी माहिती व खोटी कागदपत्र सादर करून शासनाची दिशाभूल करण्यात आलेली आहे. या सर्व मनमानी कारभाराची चौकशी व्हावी अशी मागणी निवेदनातून रोनीत पवार यांनी केलेली आहे .
शहीद वीरांसाठी बांधलेला शिलाफलक तोडफोड करणे हा सुद्धा मनमानी कारभाराचा भाग आहे. शहीद वीरांच्या सन्मानार्थ शिलाफलक बांधता येत असेल तर ग्रामपंचायतीने बांधलेला शीलाफलक तोडून शहीद वीर दत्ताराम लक्ष्मण कांबळे यांचा आणि अनेक शहीद वीरांचा तसेच सर्व सैनिकांचा अपमान केलेला आहे. त्याचबरोबर रक्षा मेडल 1965 आणि सैन्य सेवा मेडल असे प्राप्त झालेले माझे आजोबा शहीद नाईक सुभेदार वीर दत्ताराम लक्ष्मण कांबळे हे महार रेजिमेंट मधून असल्यामुळे यांनी जाणून-बुजून शिलाफलक ग्रामपंचायतीतून तोडून रातोरात इतर ठिकाणी मर्जीप्रमाणे तिथून लांब असलेल्या शाळेच्या आवारात बांधले. त्यांनी केलेल्या कृत्यावर लेखी उत्तर देऊन त्या तक्रारी संदर्भात आजपर्यंत आम्हास पोलीस यंत्र आणि जिल्हा परिषद रत्नागिरी, पंचायत समिती यांच्याकडून कोणतीच कारवाई झाली नाही. यासाठी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे रोनीत पवार यांनी लेखी स्वरुपात चिपळूण पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.
'