
सावंतवाडी : सावंतवाडी संस्थानाच्या ऐतिहासिक श्री देव पाटेकर मंदिरामध्ये श्रावण मास समाप्ती सोहळा सोमवारी १८ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षी प्रमाणे माजी आमदार शिवराम दळवी यांनी राजवाडा येथे या सोहळ्याचे आयोजन केले आहे.
सावंतवाडी संस्थानाच्या राजमाता कै. श्रीमंत सत्यशिलादेवी भोसले यांच्या कृपा आशीर्वादाने हा सोहळा अनेक वर्षांपासून संपन्न होत आहे. संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोसले, राणीसाहेब शुभदादेवी भोसले, युवराज लखमसावंत भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांच्या संमतीने सोमवारी सकाळी देवघरात देवदर्शन आणि ११ वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी आमदार शिवराम दळवी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. दरवर्षीप्रमाणे या सोहळ्याला आपण सर्वांनी उपस्थित राहून देवदर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी आमदार शिवराम दळवी यांनी केली आहे.