
चिपळूण : तळवडे तालुका चिपळूण येथे थोर संत श्री ज्ञानेश्वर माऊली यांची 750 वी जयंती अतिशय उत्साहात पार पडली. गावातील सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडीमध्ये सहभाग नोंदवला तसेच गावातील विद्यार्थी शासकीय कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका या सर्वांनी उत्साह मध्ये दिंडी पार पाडली.
हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट तीन दिवस ध्वजारोहण करून शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन, ग्रामस्थांसाठी वेगवेगळे उपक्रम यामध्ये तिरंगा बाईक रॅली, श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी दिंडी काढून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी तळवडे गाव च्या सरपंच दुर्वा विचारे, उपसरपंच ज्योती कदम, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी पूजा गरगटे, ग्रामपंचायत कर्मचारी सुशांत साळवी,अंगणवाडी सेविका सौ विद्या घोसाळकर, अंगणवाडी कर्मचारी मयुरी चव्हाण, ग्रामस्थ चंद्रकांत कदम, कांता कदम, सांची कदम, गौतम कदम, सुधाकर लाड, ऋषिकेश विचारे, संतोष विचारे, अरुण मोहिते, उदय पाटकर, ओमकार चव्हाण, प्रभाकर लाड, प्राजक्ता चव्हाण, अशा सेविका सुजल चव्हाण, प्रवीण कदम, यशवंत विचारे, पोलीस पाटील जागृती विचारे, संतोष साळवी, कृष्णा कुळे, मीना ज्यागुष्टे, सुरेखा कदम, विकास तांदळे, व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.