
सावंतवाडी : सिंधुदुर्गच्या साहित्यिकांचं मूळ हे कविवर्य डॉ. वसंत सावंत यांच्यापाशी आहे. त्यांच्यामुळे येथील साहित्यिकांवर वाड़्मय संस्कार झाला. आज अध्यक्षस्थानी असलो तरी १९७२ च्या पहिल्या कविसंमेलनाचा मी शिपाई आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकईकर यांनी केले. सिंधुदुर्ग साहित्य संघातर्फे आयोजित कोजागरी कवी संमेलनात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.
सिंधुदुर्ग साहित्य संघ आणि श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागरी कविसंमेलन २०२४ ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकईकर यांच्या अध्यक्षतेखाली व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बलवंत जेऊलकर यांच्या प्रमुख उपस्थिती कवितांच्या सादरीकरणाने पार पडले. यावेळी सामाजिक, राजकीय, जात-पात, धर्म आदी प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या मार्मिक, विडंबनात्मक कविता उपस्थितांनी सादर केल्या. यात उत्कृष्ट सादरीकरणासाठी कविवर्य डॉ. वसंत सावंत काव्य पुरस्कार कवयित्री कल्पना मलये यांना प्रदान करण्यात आला. तर नवोदित उत्कृष्ट कवी म्हणून अनिकेत पेडणेकर यास गौरविण्यात आले.
अध्यक्षीय मनोगतात दादा मडकईकर म्हणाले, कविता सादर करण्याचे व्यासपीठ डॉ. वसंत सावंत यांच्यामुळे कोजागरी संमेलनातून मिळाले. या संमेलनाला सुप्रसिद्ध साहित्यिक सावंतवाडीत यायचे,त्यांचा सहवास आम्हाला लाभायचा. सुरुवातीला मराठीतून कवीता करायचो. पण नंतर बोली मालवणीतून कविता केली, चाल लावून सादर केली. रसिकांना त्या सादरीकरणाला डोक्यावर घेतले. या संमेलनाचा शिपाई असणारा मी आज अध्यक्षस्थानी बसलो हे भाग्याचे समजतो. आजचा दिवस माझ्यासाठी स्मरणीय राहील, अशा भावना दादा मडकईकर यांनी व्यक्त केल्या. तसेच उपस्थित प्रमुख अतिथी ज्येष्ठ साहित्यिक बलवंत जेऊरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत कवितांचे सादरीकरण केले.
जिल्हाभरातील नामांकित कवींनी या संमेलनास उपस्थिती दर्शविली होती. या कवींनी एकापेक्षा एक सरस अशा स्वरचित कविता सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष मालवणी कवी दादा मडकईकर, प्रमुख उपस्थित ज्येष्ठ साहित्यिक बलवंत जेऊरकर, सिंधुदुर्ग साहित्य संघाचे अध्यक्ष लीलाधर घाडी, कार्यवाह मनोहर परब, कवी विठ्ठल कदम, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रविण बांदेकर, प्रा. डॉ. शरयू असोलकर, वंदना करंबेळकर, वामन पंडित, डॉ. जी.ए.बुवा, संध्या तांबे, डॉ. अनिल धाकु कांबळी, राजेश मोंडकर, नाना कांबळी, अँड. नकुल पार्सेकर, प्रा. रूपेश पाटील, मृण्मयी बांदेकर, कल्पना बांदेकर, तन्वी परब, सिद्धार्थ तांबे, दीपक पटेकर, कल्पना मलये,सरिता पवार, किशोर वालावलकर, ऋतुजा सावंत-भोसले, दीपक तळवडेकर, अँड. सुधीर गोठणकर, शालिनी मोहाळे, योगिता शेटकर, मंगल नाईक-जोशी, प्रज्ञा मातोंडकर, मंगला चव्हाण, महेश सावंत, मधुकर मातोंडकर, अनिकेत बेडगेकर, अरूण नाईक, मधुकर मातोंडकर, प्रा. धिरेंद्र होळीकर, भरत गावडे, प्रज्ञा मातोंडकर, महाश्वेता कुबल, स्मिता खानोलकर, दत्तप्रसाद गोठसकर डॉ. दीपक तुपकर, प्रा.केदार म्हसकर, रामदास पारकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रविण बांदेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुमेधा नाईक-धुरी तर आभार मनोहर परब यांनी मानले.