डॉक्टर नेमण्याआधीच दवाखान्याचा शुभारंभ...!

बंद दवाखाना पाहून रूग्ण परतले !
Edited by: विनायक गावस
Published on: June 08, 2023 13:25 PM
views 268  views

सावंतवाडी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सावंतवाडीत कोट्यवधीची भुमिपूजन, शुभारंभ करण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे सरकारनं राज्यभरात हिंदुह्रदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे 'आपला दवाखाना' ही महत्वकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात तब्बल 700 दवाखाने सुरू केले जात आहेत. त्यातील बहुतांश दवाखाने रूग्णसेवेत रूजू झालेत. त्या योजनेनुसार शहरात दोन ठिकाणी 'आपला दवाखाना' सुरु होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या दवाखान्यांचा शुभारंभ करण्यात आला. परंतु, हा दवाखाना बंद असल्याचं दिसून येतं आहे. अद्याप दवाखान्यासाठी डॉक्टरची नेमणूक केली नसल्याच धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. डॉक्टरची नेमणूक न करताच शुभारंभ करण्यात आल्यानं सध्यस्थिती दवाखाना बंदच आहे. त्यामुळे हा दवाखाना रूग्णसेवेत कधी येईल याकडेच सर्वसामान्यांच लक्ष लागल आहे. आरोग्यदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या जिल्ह्यात अशाप्रकारे जनतेची दिशाभूल राजकीय नेतेमंडळी करत असतील तर यासारखी दुसरी शोकांतिका नाही अशी खंत जनतेतून व्यक्त केली जात आहे. तर शुभारंभ होऊन देखील दवाखाना सुरू न झाल्यानं कुलुप पाहून जायची वेळ गोरगरीब रूग्णांवर आली आहे. लवकरात लवकर डॉक्टरची नेमणूक करून हा 'आपला दवाखाना' गोरगरीबांच्या सेवेत रूजू करावा अशी मागणी केली जात आहे.

राज्यात ठिकठिकाणी आरोग्यवर्धिनीच्या धर्तीवर   ‘आपला दवाखाना’ अंतर्गत आरोग्य सेवा सुरू करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना शिंदे-फडणवीस सरकारची नवीन आरोग्य योजना आहे. राज्यभरात असे 700 दवाखाने सुरू करण्यासाठी शिंदे सरकार गतिमानतेन कार्यरत आहे. आरोग्यसेवेच्याबाबती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः संवेदनशील असल्याने ही योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचा विशेष लक्ष आहे.

राज्यभरात पालिका आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी दिसून येते. ताप,सर्दी अशा आजारांसाठीही रुग्णांना उपचार आणि वैद्यकीय टेस्ट करण्यासाठी घरापासून दूर हॉस्पिटल गाठावे लागते. यावर उपाय म्हणून वस्तीनजीक ‘आपला दवाखाना’ असावा असं सरकारचं लक्ष आहे. राज्यातील गामीण तसंच दुर्गम भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रत्येक छोट्या आजारासाठी हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. यामुळे वैद्यकीय उपचाराला उशीर होतो.  दैनंदिन रुग्णांमुळे हॉस्पिटलवरील ताण वाढतो. ज्याचा थेट परिणाम अपघात विभाग, आयसीयू आणि प्रसूती विभागा अशा तात्काळ उपचार गरजेचा असलेल्या रुग्णांच्या उपचारावर होतो. सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत ‘बाळासाहेब ठाकरे-आपला दवाखाना’च्या माध्यमातून हजारो लोकांना विनामूल्य आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहेत. या आरोग्य सुविधा आपल्या जवळच्या आपला दवाखान्यात सकाळपासून रात्रीपर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे.या योजनेअंतर्गत साधारणपणे 25 हजार ते 30 हजार लोकसंख्येसाठी 1 दवाखान सुरू करण्याचं प्रशासनाचं नियोजन आहे.सकाळी 7 ते दुपारी 2 आणि दुपारी 3 ते रात्री 10  या वेळेत हे दवाखाने सुरू राहतील. 

आपला दवाखाना अंतर्गत विविध वैद्यकीय चाचण्या विनामूल्य करून मिळतील अशी माहिती समोर येत आहे. तर काही ठिकाणी प्राथमिक उपचारासाठी दवाखाना सुरू केला जाणार आहे. वैद्यकीय तज्ज्ञांद्वारे विनामूल्य वैद्यकीय सल्ला आणि उपचार मिळणार आहेत‌‌

या दवाखान्यात एक वैद्यकीय अधिकारी, एक परिचारिका, एक फार्मसीस्ट आणि एक मदतनीस यांची नियुक्ती करण्यात येत आहे.