यांच्यामुळे रखडली होती नवीन कुर्ली ग्रामपंचायत | अनंत पिळणकरांचे थेट पुरावे देत आरोप

Edited by: उमेश बुचडे
Published on: July 31, 2023 18:07 PM
views 73  views

कणकवली : कुर्ली विस्थापित गावाचे पुनर्वसन लोरे फोंडाघाट माळावर करण्यात आले. गेली 14 वर्ष ग्रामपंचायत मागणी मी करत आलो. या ग्रामपंचायत साठी आजपर्यंत पाठपुरावा केला. परंतु राज्याच्या नकाशावर गाव नाही. 2009 नंतर नवीन कुर्ली वसाहत  अध्यक्ष म्हणून निवड केली.  त्यानंतर मंत्रालय पर्यत पाठपुरावा, प्रस्ताव केला. त्यानंतर अधिकारी ग्रामपंचायत च्या सर्व्हे साठी  फिरायला लागले. आता या मुद्यावर श्रेयवादा ची लढाई सुरू झाली आहे. या कामाचे पुरावे सादर करा, अस कोणीतरी सांगितल. जर पुरावे दिले तर राजकारण सन्यास घेऊ, अशी मालकाची बाजू घेऊन काही जण बोलले.  पण या पूर्वी किती विरोध त्यांनी केला होता ते  आरोप करणाऱ्याना माहीत नाही. मी पुरावे सादर करतो संन्यास घेण्याबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्याचं त्यांनीच काय करायचे ते ठरवावे असा असे म्हणत थेट पिळणकर यांनी मोठा खुलासा केला आहे. कणकवलीत पत्रकार परिषदेत श्री पिळणकर बोलत होते.यावेळी त्यांच्यासोबत प्रदेश उपाध्यक्ष निलेश गोवेकर, समीर आचरेकर, नयन गावडे आदि उपस्थित होते.

पिळणकर पुढे म्हणाले, कुर्ली  ग्रामपंचायत या विषयावरून कुर्ली गाव हा हॉटस्पॉट झालाय. परंतु या ग्रामपंचायती पाठपुरावा करत असताना मी कोणाचही मदत घेतली नाही.  गावाचं काम कुटुंब समजून करतो. गावात गतटत असतात., गेली 30 वर्ष जि प मध्ये काहींची सत्ता आहे पण ग्रा. प. चा प्रस्ताव करून ती स्थापन केली पाहिजे होती. ते केलं नाही. दबावाखाली गावाचा निव्वळ राजकारणासाठी वापर केल्याचा आरोप श्री पिळणकर यांनी केला., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, राजेंद्र पराडकर,  यांनी परिपूर्ण प्रस्ताव केला. त्यामुळे हा प्रस्ताव मार्गी लागणे सोपे झाले. त्यांचे मी आभार मानतो., कोकण आयुक्त कार्यालयाला 9 फेब्रुवारी 2023 मध्ये पाठवला, 13 मार्च ला प्रस्ताव मंत्रालय पाठवला. त्यामुळे आता ग्रामपंचायत मंजूर केल्याचे श्रेय घेऊ पाहणाऱ्यांनी या तारखा अगोदर माहीत करून घ्याव्यात. ग्रामपंचायत मंजूर झाली म्हणून काहींनी गावामध्ये मिरवणूक काढली, प्रस्ताव मंजूर करून आणल्याचे सांगत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी काहींचा प्रवेश घेतला. त्याच दिवशी आमदार नितेश राणे यांनी देखील ग्रामपंचायत मंजूर व्हावी म्हणून ग्रामविकास मंत्र्यांना पत्र दिलं. मात्र त्यानंतर पुन्हा शिवसेना शिंदे गट नेते वर्धापन दिनाला गर्दी करण्यासाठी काहींना मुख्यमंत्र्यांनी सही केली आहे हे सांगून त्यांच्या भेटीसाठी घेऊन गेले. संजय आंग्रे यांनी हा दिखाऊपणा केल्याचा आरोप पिळणकर यांनी केला.  

माजी सभापती मनोज रावराणे यांनी लोरे ग्रा प होऊ नये यासाठी 3 मे 2008 मध्ये पत्र देत कुर्ली ग्रामपंचायत देऊ नये असा पत्रव्यवहार केल्याची प्रत श्री पिळणकर यांनी पत्रकार परिषदेत सादर केली. त्यामुळे निव्वळ यांची टेंडर व ठेकेदारीसाठी धडपड असल्याचा टोला त्यांनी लगावला. तसेच 26 फेब्रुवारी 2013 ग्रामसभेमध्ये ठराव घेत जोपर्यंत मागण्या पूर्ण नाही तो पर्यत नवीन ग्रामपंचायत करण्याबाबतचा ठराव देता येणात नाही असं मनोज रावराणे यांनी पत्र दिल्याचा आरोप त्यांनी केला. नवीन कुर्ली च्या विस्थापित लोकांना न्याय मिळाला पाहिजे. मनोज रावराणे सभापती असताना ग्रामस्थांच्या यादीमध्येही त्यांनी छेडछाड केल्याचा आरोप त्यांनी केला.

एकीकडे ग्रामपंचायतला विरोध करायचा व दुसरीकडे ग्रामपंचायत मागणीसाठी उपोषणाचा स्टंट करायचा ही दुटप्पी भूमिका आहे. मात्र त्यांची ही भूमिका मी उघड करत असल्याने माझ्या विरोधात खोट्या केसेस दाखल केला जातात. परंतु मी अजून पुरावे सादर केले तर पळता भुई थोडी होईल.  अनेकांच्या भानगडी माझ्याकडे, आहेत खोडसाळपणा बंद करा असा इशारा त्यांनी दिला.