फोंडाघाट जुगार छाप्यातील नावे आलीत समोर..!

Edited by:
Published on: September 25, 2023 10:53 AM
views 1099  views

कणकवली : फोंडाघाट बाजारपेठेत गांधी चौकातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अंदर बाहर जुगार अड्ड्यावर कणकवली पोलिसांनी शनिवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास धाड टाकली. फोंडाघाट बाजारपेठेसह गावातील ९ जणांना जुगार खेळताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्या ताब्यातून १ लाख १ हजार ६०० रोख रक्कम रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. या प्रकरणी त्या नऊ जणांवर पोलीस शिपाई सचिन माने यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फोंडाघाट बाजारपेठ येथील राज हॉटेलच्या पाठीमागील बाजू असलेल्या माडीवर काही लोक अंदरबहार जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती कणकवली पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली फोंडा घाट दूरक्षेत्राचे पोलीस नाईक उत्तम वंजारे, पोलीस नाईक चंद्रकांत झोरे, मनोज गुरव,  वाहतूक पोलीस विनोद चव्हाण यांच्यासह आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी जात जुगार खेळत असणाऱ्यावर कारवाई केली.

याप्रकरणी शामसुंदर शिवाजी मोदी (५१, रा. फोंडाघाट कोरगावकरवाडी), सिनू मायांडी देवरा (५०,रा. फोंडाघाट मारुती वाडी), रोहित संतोष पारकर (३२ रा.फोंडाघाट बाजारपेठ), मारुती नारायण रेवडेकर (४० रा.फोंडाघाट बाजारपेठ), आनंद बबन चिके (३५,रा. फोंडाघाट बाजारपेठ) प्रकाश दत्तात्रय साळवी (३०,रा. फोंडाघाट बाजारपेठ) संदीप पांडुरंग कोथिंबीरे (५०,रा. फोंडाघाट बाजारपेठ) आनंद मारुती पावसकर (४४,रा. फोंडाघाट जुना बाजारपेठ) मनीष हरिभाऊ गांधी (४९, रा.फोंडाघाट बाजारपेठ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.