
कणकवली : कणकवली नगरपंचायतीने आपल्या मर्जीतील व्यवसायिकांची आरक्षण उठवली आहेत. व स्थानिक मूळ शेतकरी यांच्या जमिनीवर ही आरक्षणा लादण्यात आली असल्याचा गौप्य स्पोट नगरसेवक सुशांत नाईक यांनी केलाआहे. सहा महिने उलटून गेले तरी डीपी प्लान सादर करण्यासाठी सत्ताधारी व नगर रचनाकार दिरंगाई करत असल्याचे देखिल नाईक यांनी सांगितले.
कणकवली शहरातील डीपी प्लॅनिंग भाजपाच्या सत्ताधारी लोकांच्या दबावाखाली रखडून ठेवण्यात आलेला आहे. या सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा दुरुपयोग करत आरक्षित जमिनी शेतकऱ्यांकडून कमी किंमतीत घेतलेल्या आहेत. त्या जमिनीवरील ग्रीन झोन उठवून त्या जमिनी येलो झोन मध्ये टाकण्यात आलेले आहेत.सत्ताधाऱ्यांनी कणकवलीकरांची केलेली फसवणूक रोखण्यासाठी झालेला डीपी प्लान तातडीने जाहीर करण्यात यावा, यासाठी नगररचनाकार सिंधुदुर्ग यांना आम्ही जाब विचारला. कारण १३ एप्रिल नंतर कणकवली नगरपंचायत वर प्रशासक लागणार आहे. सत्ताधाऱ्यांच्या फसवणुकीच्या धोरणामुळे प्रशासक लागल्यावर हा डीपी प्लॅन प्रसिद्ध करण्याचा डाव आम्ही उधळून लावला आहे. नगररचनाकार अधिकाऱ्यांनी २४ मार्चला हा प्लॅन प्रसिद्ध करणार असल्याचे आश्वासन दिल्याची माहिती युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिली आहे. ओरोस येथील जिल्हा नगररसाकार यांच्या कार्यालयात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर,शहराध्यक्ष उमेश वाळके,नगरसेवक रुपेश नार्वेकर ,सुजित जाधव, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर ,तेजस राणे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते