
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर सुरू असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक डीएड पदविकाधारक बेरोजगार संघटनेचे आंदोलन अखेर 10 दिवसांनी तूर्तास स्थगित झाले आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत मुंबई येथील बैठकीत सकारात्मक निर्णय झाला असून, या निर्णयामुळे आपले सर्व प्रश्न सुटणार असल्याचा विश्वास व्यक्त करत. हे आंदोलन आपण तुर्ताच स्थगित करत असल्याचे पदविकाधारक बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष विजय फाले यांनी सांगितले. यावेळी उपस्थित सर्व आंदोलकांच्या डोळ्यांमध्ये अक्षरशा आनंदाश्रू तळत होते.