
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा फळ उत्पादनात अग्रेसर आहे. येथील हापूस आंब्याला जागतिक मागणी आहे. परंतु येथील उत्पादक, व्यापारी यांना वाशी येथील बाजार समितीत तेथील दलाल सांगतील त्या भावाला आपले उत्पादन विकावे लागत आहे. सर्व मेहनत या लोकांनी करायची, मात्र जास्त लाभ त्यांनी घ्यायचा. या गुलामगिरीतून सुटका करण्यासाठी आपण नांदगाव येथे मार्केट यार्ड उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
याला येणाऱ्या खर्चातील ८० टक्के खर्च राज्य शासनाने मंजूर केला आहे. उर्वरित २० टक्के खर्च आमदार म्हणून मी, जिल्हा बँक आणि सिंधुदुर्ग बाजार समिती उचलणार आहोत. लवकरच या कामाला सुरुवात होवून हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल, असे आ राणे यांनी सांगितले.