कुणकेश्वर यात्रा उत्सवासाठी बाजारपेठ गर्दीने फुलली | कुणकेश्वर यात्रा उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 07, 2024 14:35 PM
views 118  views

देवगड : दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र कुणकेश्वर यात्रा उत्सव दिनांक ८ मार्च १० मार्च कालावधीत संपन्न होत आहे. श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट,ग्रामपंचायत कुणकेश्वर,त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन यंत्रणा, महसूल यंत्रणा, जिल्हा परिषद,पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम,महसूलविभाग,राज्य विज वितरण कंपनी, यांनी आपल्या पद्धतीने भाविक भक्तांना आणि त्याचप्रमाणे व्यापारी बंधूंना आवश्यक त्या सोयी सुविधा देण्याकरिता कार्यवाही पूर्ण केली आहे.दिनांक 8 मार्च रोजी रात्री ३ वाजल्यापासून श्री देव कुणकेश्वर दर्शनाकरिता भाविकांना खुले करण्यात येणार आहे.तत्पूर्वी यामध्ये या मंदिराचे पुजारी मानकरी आणि त्याच प्रमाणे जे प्रमुख मान्यवर असतील त्यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे.आणि या अनुषंगाने श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट च्या वतीने कुणकेश्वर मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई त्याचबरोबर फुलांच्या आरसा करून साजवीन्यात  आले आहे.

आणि विशेषता भावीक भक्तांना आवश्यक असणाऱ्या सर्व दर्शनरांगा पूर्णपणे सज्ज करण्यात आले आहेत. व्हीआयपी  साठी देखील यावर्षीपासून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या ज्या सोयी सुविधा पूर्ण करण्यात आल्या आहेत.त्याचप्रमाणे ठीक ठिकाणी स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत.कुणकेश्वर मंदिराचा संपूर्ण परिसर या ठिकाणी प्रत्येक विविध प्रकारच्या दुकानांची सजावट आणि दुकानांच्या आगमन झाले असून ही संपूर्ण पणे दुकाने या ठिकाणी ८ मार्च १० मार्च या कालावधीत अहो रात्र सुरू ठेवण्यात येणार आहेत.येणारे भाविक भक्त आणि व्यापारी बंधू आणि येणाऱ्या देवस्वाऱ्या यांना आवश्यक असणारे सोयी सुविधा पुरविणे या साठी श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट ग्रामपंचायत सज्ज झाली आहे.तसेच या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना सूसज्ज राज्य परिवहन महामंडळाच्या देवगड, विजयदुर्ग, कणकवली ,मालवण, व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अन्य आगारातून खास एसटीच्या जादा फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्याचबरोबर या भागात येणारे जे भाविक भक्तगण एसटीचे प्रवासी असतील त्यांच्या आवश्यकतेनुसार पार्किंगची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.एक पार्किंग व्यवस्था ही कणकवली-मालवण वरून येणारी कुणकेश्वर सुकेतळे सडा या ठिकाणी देवगड-विजयदुर्ग भागातून व्यवस्था ही देवगड तारामुंबरी हॉटेल अस्मि या ठिकाणी करण्यात आली आहे. आणि त्याचप्रमाणे मीठबाव मालवन वरून येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंगची व्यवस्था कुणकेश्वरच्या ठिकाणी करण्यात आली आहे. कुणकेश्वर यात्रा उत्सवासाठी दुकाने सज्ज बाजारपेठ गर्दीने फुलली कुणकेश्वर यात्रा उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात