बाजार मांडला रक्ताचा, जीव जातो लोकांचा..! - युवासेनेचा जिल्हा रुग्णालयावर भव्य मोर्चा

Edited by: प्रतिनिधी
Published on: April 03, 2023 20:19 PM
views 138  views

ओरोस : 'रक्तपिपासू सरकारचा निषेध असो', 'ह्या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय', 'रक्ताचे दर कमी करा, नाहीतर खुर्च्या खाली करा', 'बाजार मांडला रक्ताचा, जीव जातो लोकांचा..!', अशा गगनभेदी घोषणा देत रक्त पिशवी दरवाढी विरोधात सिंधुदुर्ग जिल्हा युवासेनेच्यावतीने युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली ओरोस येथील जिल्हा रुग्णालयावर सोमवारी भव्य मोर्चा काढण्यात आला.

ओरोस म्हाडा कार्यालय ते जिल्हा रुग्णालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. आम. वैभव नाईक, जिल्हाप्रमुख सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट या मोर्चात सहभागी झाले होते.

 शिंदे - फडणवीस सरकारने रक्तपुरवठा सेवा शुल्काचे नवीन दर लागू केले आहेत. ठाकरे सरकारच्या काळात शासकीय रक्त केंद्राकडे एका रक्त पिशवीचा दर ४५० रुपये होता. आता हा दर ११०० रुपये करण्यात आला आहे. तर अशासकीय रक्त केंद्राकडे एका रक्त पिशवीचा दर १५५० रुपये करण्यात आला आहे. हे दर सर्वसामान्यांना परवडणारे नसल्याने या दरवाढीविरोधात युवासेना आक्रमक झाली आहे. यावेळी रुग्णांची व्यथा मांडणारी प्रतिकृती साकारण्यात आली, तसेच घंटानाद करण्यात आला.

याप्रसंगी आ. वैभव नाईक म्हणाले, रक्त पिशवीच्या दरात वाढ झाल्याने त्याविरोधात आवाज उठविण्याचे काम तुमच्यासारखा सामान्य शिवसैनिकच करू शकतो, हे आजच्या मोर्चाच्या उपस्थितीवरून दिसून आले. राम नवमीला एखाद्या मिरवणूकीत सहभागी झालं म्हणजे हिंदूत्व नाही, किंवा नवनीत राणांसारखी कुठेतरी हनुमान चालीसा वाचली म्हणजे हिंदूत्व होत नाही. जनसेवा हेच आमचे हिंदूत्व आहे. गरजवंतांची गरज पूर्ण करणे, ज्याला रक्ताची गरज आहे, त्याला रक्त उपलब्ध करून देणे आणि हे करत असताना हिंदू, मुस्लिम भेद न करणे हेच शिवसेनेचे हिंदूत्व आहे.

यावेळी जिल्हाप्रमुख सतीश सावंत, संदेश पारकर, संदेश पारकर यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख राजू शेट्ये, विधानसभा प्रमुख सचिन सावंत, कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, देवगड तालुका प्रमुख मिलिंद साटम, वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके, नगरसेवक कन्हैया पारकर, शहरप्रमुख प्रमोद मसुरकर, युवासेना कणकवली तालुकाप्रमुख उत्तम लोके, युवासेना वैभववाडी तालुकाप्रमुख अतुल सरवटे, युवासेना देवगड तालुकाप्रमुख गणेश गावकर, फरीद काझी, युवासेना जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुरी, जिल्हा समन्वयक राजू राठोड, बाबू टेंबुलकर, छोटू पारकर, अवधूत मालणकर, हर्षद गावडे, बाळू मेस्त्री, सचिन आचरेकर, तेजस राणे, अनुप वारंग, जयेश धुमाळे, आदित्‍य सापळे, वैभव मालंडकर, सोहम वाळके, अनुराग सावंत, ललीत घाडीगावकर, गौरव हर्णे, रिमेश चव्हाण, सुदाम तेली, निसार शेख,विलास गुडेकर, सिद्धेश राणे, धनंजय सावंत, अमित राणे, गुरुनाथ पेडणेकर, राजू गवंडे, दिनेश नारकर, आनंद मर्गज, सुनील जाधव, प्रदीप गावडे, नागेश ओरोसकर, रवी कदम, निलेश राणे, उद्धव पारकर, सचिन सुतार, सुहास ठुकरुल, दर्शन मराठे, स्वरुपा विखाळे, वैदेही गुडेकर, काजल सावंत, योगेश मुंज, रोहित पावसकर, गणेश वाळके, संदीप गावकर, रवींद्र रावराणे, आदींसह युवासेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.