
जालना : उपोषणाच्या नवव्या दिवशी उपोषण करते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. वैद्यकीय पथकाने तपासणी केल्यानंतर याची माहिती दिली. जरांगे यांना सलाईन लावण्यात आले आहे. त्यांचा बीपी कमी झाला असून, शुगरही कमी झाली आहे. आरोग्य पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.
दरम्यान जरांगे पाटील यांना महाराष्ट्रातून पाठिंबा मिळत आहे. अनेक मंत्री, आमदार, नेते, सामाजिक कार्यकर्ते त्यांची भेट घेत आहेत. शासनाकडून त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, मात्र अद्याप कोणताही मार्ग निघालेला नाही. त्यातच आज मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा नववा दिवस असून, त्यांची प्रकृती खालावली आहे. वैद्यकीय पथकाकडून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे.