सैनिक फेडरेशनने आजपर्यंत केलेलं मुख्य कार्य

सैनिकांच्या प्रमुख मागण्या
Edited by:
Published on: November 18, 2024 19:44 PM
views 181  views

सैनिक फेडरेशन ने आजपर्यंत केलेली मुख्य कार्य

१. महाराष्ट्रात सैनिकांना संपूर्ण मालमत्ता कर माफ.

२. उच्च शिक्षणात सैनिकांच्या पाल्यांना ५% कोटा रिझर्व व अंमलबजावणी.

३. सैनिकाच्या पाल्यांना व विधवांना नोकरीत आरक्षण.

४. सैनिक ,वीर नारी, पाल्य यांना 50 लाख ते एक करोड उद्योगासाठी हार्दिक सहाय्य.

५. पुनर्नियुक्त माजी सैनिकांना जिल्ह्यांतर्गत बदलीचा जीआर.

६. शिक्षकांना टीईटी परीक्षेत ४०% मार्क ची सवलत.

७. प्रत्येक विभागात सैनिकांचा आरक्षित कोटा पूर्ण भरणे.

८. टेक्निकल विभागात जॉईन केल्यानंतर टेक्निकल ट्रेनिंग ची व्यवस्था.

९. फायर मॅन नियुक्त झाल्यानंतर ट्रेनिंग ची  अंमलबजावणी .

१०.नवी मुंबई फायर विभागात माजी सैनिकांची स्पेशल भरती.

११. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सैनिकांची स्पेशल भरती.

१२. शासनाच्या सर्व विभागात सैनिकांचा आरक्षित कोटा भरण्याकरिता केलेला पाठपुरावा यशस्वी.

१३. सैनिकांना मंत्रालयात जाण्यासाठी स्पेशल पास.

५. २९ माजी सैनिकांना आरटीओ मध्ये उपनिरीक्षक पदावर भरती व जिल्ह्यांतर्गत बदली.

१७. शाळा ,कॉलेज विद्यार्थ्यांना सैन्य भरतीचे मार्गदर्शन. अंमलबजावणी नाही.

२२. महसूल विभागातील तलाठी या पदासाठी नियुक्त झालेल्या सर्व माजी सैनिकांना नियुक्ती.

२३. आरोग्य विभागातील सर्व निवड झालेल्या माजी सैनिकांना नियुक्ती. अंमलबजावणी नाही

२४. सैनिक व सैनिक परिवाराच्या कल्याणासाठी सैनिक महामंडळ स्थापन करण्याचे निर्देश. अंमलबजावणी नाही

२५. माजी सैनिक व त्यांच्या परिवारासाठी नवी मुंबई (खारघर) येथे 500 बेडचे सैनिक आराम गृह अंमलबजावणी नाही

२६. शासनाच्या प्रत्येक विभागात सैनिकांच्या आरक्षणासाठी सैनिकांची स्वतंत्र मेरिट लिस्ट. स्पोर्ट्स व पी टी शिक्षकांसाठी सैनिकांची स्पेशल भरती

२७. सैनिक पाल्यांसाठी व सैनिकांच्या पत्नीसाठी अनुकंप धोरणामध्ये बदल

२८. मेस्को महामंडळा मध्ये फेरबदल व सैनिकांच्या वेतन वृत्तीमध्ये वाढ व मेस्को ॲक्ट मध्ये सुधारणा अमोल बजावणी नाही

३०. एस आर पी एफ मधील पुनर्नियुक्त माजी सैनिकांना पोलीस मध्ये वर्ग करण्यासा सवलत घेण्यात आली नाही

३२. मुंबईमध्ये मिलिटरी संग्रहालयाची स्थापना

३३. सैनिकांना राज्यामध्ये टोल फ्री ची घोषणा

३४. पुनर्नियुक्त सैनिकांच्या वेतन निश्चिती व पेन्शन यामध्ये सुधारणा

३५. शासनाच्या विविध विभागामध्ये सैनिकांना कॉन्ट्रॅक्ट वर घेण्याच्या पद्धतीचा पुनर्विचार

३६. उद्योग विभागामार्फत सैनिकांना उद्योगासाठी एमआयडीसी मध्ये  जागेसाठी विशेष सवलत

३७. सैनिकांच्या  उद्योगांना शासनातर्फे आर्थिक सबसिडी* अजून देण्यात आली नाही

३८. माडा घरांच्या लॉटरीमध्ये सैनिकांच्यासाठी स्पेशल कोटा

सैनिकांच्या प्रमुख मागण्या

१.सैनिकांना वयाच्या साठ वर्षे रोजगाराची हमी.

२. सैनिक व सैनिक परिवारासाठी स्पेशल प्रोटेक्शन ॲक्ट.

३. सैनिक व सैनिक परिवाराला संसदीय प्रणालीमध्ये आरक्षण.

४. स्वतंत्र मतदार संघाची स्थापना.

६. सैनिकांच्या व सैनिक परिवारांच्या जमिनी भावबंधांनी हडप केल्यावर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी

७.माजी सैनिकांना  मिळालेल्या वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये करणे

८. माजी सैनिकांना क्लास १ ग्रुप (अ)आणि क्लास २ ग्रुप(बी )मध्ये रिझर्व्हेशन मिळणे


ब्रिगे. सुधीर सावंत 

अध्यक्ष 

सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य